Home /News /mumbai /

धारावीत चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; खाऊ देत असल्याचे सांगून तरुणाने...

धारावीत चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; खाऊ देत असल्याचे सांगून तरुणाने...

लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याच्या घटनेनंतर धारावीत खळबळ उडाली आहे.

    मुंबई, 23 नोव्हेंबर : मुंबईतील धारावी (Dharavi) भागात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चार अल्पवयीन (Minor Girls) मुलींसोबत लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याच्या घटनेनंतर धारावीत खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी यापैकी दोन मुलींचा नातेवाईक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार धारावीत राहणाऱ्या एका व्यक्तीने खाऊ देण्याच्या बहाण्याने चार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. हा व्यक्ती एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतो. हे ही वाचा-दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावर बसला पती सुरुवातील हा व्यक्ती मुलींना खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तीन मुलींवर अत्याचार केल्यानंतर त्याने चौथ्या मुलीवरही अत्याचार केले. चौथ्या पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना जाऊन सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. हे ही वाचा-आधी आई..बाबा आणि मग भाऊ; एक-एक करीत 5 दिवसात कोरोना योद्ध्याचं कुटुंब उद्ध्वस्त चौकशीदरम्यान मुलींवर अत्याचार केल्याची कबुली तरुणाने दिली आहे. पीडित मुलींवर दोन मुली या आरोपीच्या नातेवाईक असल्याची बाब समोर आली आहे. या चार मुलींपैकी दोन मुली या 5 आणि एक मुलगी 7 तर दुसरी 8 वर्षांची आहे. पोलिसांनी पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या