या कारणामुळे सेक्स वर्कर्स मुंबईतील 'हा' रेड लाइट एरिया सोडून जाण्यास मजबूर

या कारणामुळे सेक्स वर्कर्स मुंबईतील 'हा' रेड लाइट एरिया सोडून जाण्यास मजबूर

मुंबईतील रेडलाइट एरिया असलेला कामाठीपुरा. दरवर्षी हजारो सेक्स वर्कर्सची ट्रॅफिकिंग होते. महिला तसेच लहान मुलींपासून ते कॉलेज गर्ल्सपर्यंत अनेकींना खोटी आश्वासने, प्रलोभन दाखवून या देहविक्रीच्या दलदलीत ढकलले जाते....

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट- मायानगरीतील रेडलाइट एरिया असलेला कामाठीपुरा. आंध्रप्रदेशच्या कमाठी मजुरांच्या नावावरून या परिसराला कमाठीपुरा म्हटले जाते. येथे 5 हजारपेक्षा अधिक सेक्स वर्कर्स राहतात. येथे दरवर्षी हजारो सेक्स वर्कर्सची ट्रॅफिकिंग होते. महिला तसेच लहान मुलींपासून ते कॉलेज गर्ल्सपर्यंत अनेकींना खोटी आश्वासने, प्रलोभन दाखवून या देहविक्रीच्या दलदलीत ढकलले जाते. सेक्स वर्कर्सना या ठिकाणी रोज अत्याचारांचा सामना करावा लागतो. मात्र, कमाठीपुरा येथे वास्तव्य करणाऱ्या सेक्स वर्कर्स उपनगरात स्थलांतरीत होताना दिसत आहेत. त्यामागे मोठे कारण आहे. ते म्हणजे, रियल इस्टेट. रियल इस्टेटच्या वाढत्या किमतीमुळे बहुतांश सेक्स वर्कर्सला हा परिसर सोडण्यास मजबूर केले जात आहे.

न्यूज एजन्सी 'एएनआय'ला सोशल एक्टिव्हिटीज इंट्रीग्रेशन (SAI)एनजीओचे डायरेक्टर विनय वत्स यांनी सांगितले की, कमाठीपुरा आणि फाल्कलंड येथील सेक्स वर्कर्सच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. रियल इस्टेटचा सगळ्यात मोठा परिणाम कामाठीपुरा येथील सेक्स वर्कर्सवर होत आहे. खोली भाडे देणे अवघड झाल्याने बहुतांश सेक्स वर्कर्स हे ठिकाण सोडण्यास मजबूर झाल्या आहेत. नालासोपारा, तुर्भे आणि वाशीमध्ये त्यांनी स्थलांतरित व्हावे लागत आहे.

25 रुपयांवरून 200 रुपयांवर गेलं भाडं..

विनय वत्य यांनी सांगितले की, सेक्स वर्कर्सनी कमाठीपुऱ्यात 90 च्या दशकात हे काम सुरू केले होते. मागील 20 वर्षांत खोलीच्या भाड्यात बेफाम वाढ झाली आहे. 90 च्या दशकात 25 रुपये भाडे होते. मात्र, सद्यस्थितील दिवसाचे भाडे किमान 200 रुपये असून महिन्याचे भाडे 10 ते 15 हजार रुपयांवर पोहोचले आहे.

रियल इस्टेट डेव्हलपर्सचा कमाठीपुऱ्यावर 'डोळा'

कमाठीपुरा भागात घर भाड्यात बेफाम वाढ झाल्याबाबत विनय वत्स यांनी सांगितले की, 'सेंट्रल मुंबईत हा परिसर मोडतो. विशेष म्हणजे बॉम्बे सेंट्रल आणि ट्राडेव्हो सारखा कमर्शियल परिसर कमाठीपुऱ्याला लागून आहे. यामुळेच रियल इस्टेट डेव्हलपर्सचा कमाठीपुऱ्यावर डोळा आहे.

'भाडे वाढले पण उत्पन्न नाही!'

आरती नामक सेक्स वर्करने कमाठीपुऱ्यातील समस्या आणि विनय वत्स याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. आरतीने सांगितले की, ती ठाण्याहून कमाठीपुरा येथे देहविक्री करण्यासाठी येते. ती मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे. खोली भाड्यात सतत वाढ होत आहे, मात्र त्या तुलनेत उत्पन्नात वाढ होत नाही आहे. कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले असल्याचे आरतीने सांगितले.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 17, 2019, 4:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading