• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Sex Racket चा पर्दाफाश, ठाण्यात स्पाच्या नावाखाली सुरू होतं रॅकेट

Sex Racket चा पर्दाफाश, ठाण्यात स्पाच्या नावाखाली सुरू होतं रॅकेट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Sex Racket busted in Thane : ठाणे पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

  • Share this:
    ठाणे, 23 ऑक्टोबर : मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका स्पा सेंटरमध्ये हे रॅकेट सुरू (Sex racket in Spa center) होतं. पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे. (Thane Police busted sex racket) मॉलमध्ये असलेल्या थाई स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या स्पा सेंटरमध्ये एक डमी ग्राहक पाठवला. यावेळी डमी ग्राहकाला स्पामधील व्यक्तीने एका सेशनसाठी पाच हजार रुपये देण्यास सांगितले आणि डील फायनल झाली. त्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना कळवले आणि मग पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे. या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात होता. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली तर स्पा व्यवस्थापकाला अटक केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईत सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा (Sex Tourism) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने दोन महिला दलालांना अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिला ही दोन तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. कसं काम करत होतं हे रॅकेट ? ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत असे. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी अंती डील फायनल केली जात असे. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकांसोबत संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी पाठवत असे. भारतातील विविध पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असे. सर्वप्रथम मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवण्यात येत होते. ग्राहकांना मुलींचा फोटो आवडल्यानंतर गोवा किंवा इतर ठिकाणावर जाण्यासाठी फ्लाईट तिकिट स्वत: बुक करावी लागत असे. ग्राहकांकडून ही टोळी दोन दिवसांसाठी 50 हजार रुपये घेत असे. अटक करण्यात आलेल्या आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घेत असे. यानंतर आपल्या आवडत्या मुलीसोबत ग्राहकाला दोन दिवस फिरण्यासाठी गोवा किंवा अन्य ठिकाणी पाठवले जात असे. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा हे मुंबईला येत असतं.
    First published: