ललिता साळवे प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, 'मॅट'कडे जाण्याचे निर्देश

ललिता साळवे प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, 'मॅट'कडे जाण्याचे निर्देश

महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेची लिंग बदल परवानगी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.

  • Share this:

रोहिणी गोसावी,प्रतिनिधी

30 नोव्हेंबर : बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेची लिंग बदल परवानगी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. कोर्टाने ललिताला मॅट कोर्टामध्येच जाण्याचे निर्देश दिले आहे.

पोलिस डिपार्टमेंट, महाराष्ट्रसरकार, नंतर उच्च न्यायालय... बीडच्या ललिता साळवेचा लिंगबदल परवानगीसाठीचा प्रवास अजून संपतच नाहीये. उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार आता ललिता साळवेला मॅटमध्ये दाद मागवी लागणार आहे. उच्च न्यायालयाने ललिता साळवेची याचिका आज निकालात काढली. हे प्रकरण सर्व्हिस मॅटर म्हणजे सेवेशी संबंधीत असल्यानं आणि महाराष्ट्र सेवा कायद्यात लिंगबदलाविषयी कोणतीही तरतूद नसल्यानं मॅट च्या न्यायकक्षेत येत असल्याचं उच्च न्यायालयाने नमुद केलंय.

ललिता साळवेनं लिंग बदल केला तर नोकरी सोडावी लागेल असं महासंचालक कार्यालयातून तिला सांगण्यात आलं होतं, त्यामुळे सेवेशी संबंधीत असलं तरीही शस्त्रक्रीयेनंतर पुन्हा नोकरीवर कायम राहणं हा ललिताचा मुलभूत अधिकार असल्याचे तिच्या वकिलांनी आपली बाजू मंडताना सांगितलं. तसंच मॅटमध्ये सुनावणीला खूप वेळ लागतो, तेवढा वेळ वाट पाहणे शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मॅटमध्ये जर समाधान झालं नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे खुले असल्याचं न्यायधिशांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 02:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading