अखेर प्रतीक्षा संपली! सीरममधून पहिला कोव्हिशील्ड लसीचा साठा मुंबईत दाखल

अखेर प्रतीक्षा संपली! सीरममधून पहिला कोव्हिशील्ड लसीचा साठा मुंबईत दाखल

पुण्याहून मुंबईला लसीचा पहिला साठा येत असताना त्यासोबत पोलिसांची 2 वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे. बुधवारी पहाटे याचा पहिला साठा मुंबईमध्ये दाखल झाला असून मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.

सीरमनं तयार केलेल्या कोरोनाच्या लशीचा कोव्हिशील्ड लसीचा पहिला साठी बुधवारी पहाटे 5.30 वाजता मुंबईत दाखल झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे. इथून तो मुंबईतील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरणासाठी पाठवण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा आणला. पुण्याहून मुंबईला लसीचा पहिला साठा येत असताना त्यासोबत पोलिसांची 2 वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. 16 जानेवारीला मुंबईत लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्षात लसीकरणाच्या दिवसाची मुंबईकर आतूरतेनं वाट पाहात आहेत.

नातवांनी पुरवला आजोबांचा हट्ट, वाढदिवसाच्या अनोख्या गिफ्टने गाव झाला चकित

राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबई 3, कोल्हापूर 1, पुणे 2 लसीच्या व्हॅन पोहचल्या आहेत तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आज राज्यातील 26 ठिकाणी लसीच्या व्हॅन जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी 13 शहरांमध्ये लसीचा पहिला साठा 8 विमानांच्या सहाय्यानं पोहोचवण्यात आला होता.

First published: January 13, 2021, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading