Home /News /mumbai /

"जे निर्भयासोबत घडलं तेच पीडितसोबत घडलं", पुण्यातील दोन राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप, 7 दिवसांत कारवाईची भाजपची मागणी

"जे निर्भयासोबत घडलं तेच पीडितसोबत घडलं", पुण्यातील दोन राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप, 7 दिवसांत कारवाईची भाजपची मागणी

पुण्यातील दोन राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप, सात दिवसांत कारवाई करण्याची चित्रा वाघ यांची मागणी

पुण्यातील दोन राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप, सात दिवसांत कारवाई करण्याची चित्रा वाघ यांची मागणी

Rape allegation against Pune politicians: पुण्यातील दोन राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्या मुलीने शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता त्याच पीडित मुलीने आता राष्ट्रवादीच्या नेत्यावरही आरोप केला आहे.

पुढे वाचा ...
    तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई, 24 फेब्रुवारी : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांच्यासोबत एक पीडित मुलगी सुद्धा उपस्थित होती. ज्या मुलीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. याच पीडित मुलीने आज पत्रकार परिषदेत आणखी एका राजकीय नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं, 16 फेब्रुवारीच्या दिवशी मला एका मुलीचा फोन आला की मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्या मुलीने सांगितलं की, माझ्यावर अत्याचार झालाय आणि पोलिसांत तक्रार देण्यासाठी मला मदत हवीय. त्यानंतर रात्री पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यावेळी मी मुंबई बाहेर होते आता दोन दिवसांपूर्वी मी पीडित मुलीला भेटली. त्यावेळी तिने तिच्यासोबत जे काही घडलं ते तिने मला सांगितलं आणि ते ऐकून अंगावर काटा येतो. ही खरोखर निर्भया आहे, एकटी लढत आहे. अनेकवेळा आत्महत्येचे तिच्या मनात विचार आले पण या आरोपींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं पीडित मुलीने सांगितलं. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ही खरोखर निर्भया आहे. अशा कित्येक निर्भया गेल्या. ज्या जिवंत आहेत, ज्या लढत आहेत त्यांच्याकडे का दुर्लक्ष केलं जात आहे. या निर्भयाला बळ देण्यासाठी या निर्भयाच्या मागे भारतीय जनता पक्ष सक्षम उभा आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना मी सांगते की या प्रकरणात 7 दिवसांत तुम्ही पुणे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश द्या असंही चित्रा वाघ म्हणाल्या. वाचा : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल काय म्हणाली पीडित मुलगी? पीडित मुलगी म्हणाली, पुण्यात एक स्पर्धा आयोजित केली त्यात माझा नंबर आला होता. मी पुण्यात डिप्लोमासाठी ॲडमिशन आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याच्या पतीने मला मोठी ओळखत सांगून मला पुण्यातील ॲाफिस मध्ये बोलावलं. त्यांनी मला रिसिव्ह केल आणि मला कॅाफी देण्यात आली. त्यानंतर बेशुद्ध झाली होती. माझ्यावर अत्याचार करून माझा व्हिडिओ काढण्यात आला आणि मला ब्लॅकमेल करण्यात आलं. मी सुप्रिया सुळे, अजित पवार,अमोल कोल्हे या सर्वांना भेटले मला कोणीच सहकार्य केल नाही. मला पवार साहेबांना भेटायचं होत मात्र माझी भेट होऊ शकली नाही. मला तिथे न्याय मिळाला असता. मी आत्महत्या करायला निघाले होते मात्र आई बाबांसाठी थांबले असंही पीडित मुलगी म्हणाली. वाचा : आधी गुन्हे केले मग लिहिली कथा; आता बनवणार चित्रपट, लेखकाचा कांड वाचून बसेल धक्का शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरही आरोप पीडित मुलीने सांगितलं, रघुनाथ कुचिक यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. मला त्यांनी सांगितल की माझ्या बायकोसोबत घटस्फोट होणार आहे. मी तुझ्यासोबत लग्न करतो असं मला सांगितल गेलं. मला ते बोलले तुझ्यावर जो अत्याचार झाला त्याला सहकार्य करेन. ते जेव्हा माझ्यासोबत शारीरिक अत्याचार करायचे तेव्हा मी प्रेग्नंट झाले. तेव्हा मला रघुनाथ कुचिक बोलले की तु ॲर्बोशन करून घे, मी सांगितलं की मला बाळ हवं आहे मी ॲर्बोशन करणार नाही. यानंतर मला धमकी देऊन मला गोळ्या घेण्यास सांगितलं. मला दीनानाथ मंगेशकर हॅास्पिटलमध्ये माझ्यावर उपचार केले. मला ॲर्बोशन किट देण्यात आले. मात्र मी गोळ्या घेतल्या नाहीत. त्यानंतर मला हॅाटेलला बोलवून समजूत ॲग्रीमेंट करण्यात आलं. मला जबरद्स्तीने मला हॅास्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि माझं ॲर्बोशन करण्यात आलं असा आरोपही पीडित मुलीने केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Chitra wagh, Mumbai, Pune, Shiv sena

    पुढील बातम्या