15 पेक्षा जास्त बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट अखेर पोलिसांच्या ताब्यात

15 पेक्षा जास्त बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट अखेर पोलिसांच्या ताब्यात

काल संध्याकाळी सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 27 सप्टेंबर : नवी मुंबई पोलिसांनी मोठा कामगिरी केली आहे. काल संध्याकाळी सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी अटक केलेला सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशी हा उत्तर प्रदेशमध्ये राहणार आहे. रेहान कुरेशीवर आतापर्यंत 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नवी मुंबईत 7, मुंबईत 2, उरणमध्ये 2 तर पालघरमध्ये 4 अशा पद्धतीने त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये व्यक्तीची चप्पल आणि कपडे सारखेच आहेत. त्यातून रेहानला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, घराची झडती घेताना पोलिसांनी रिहानला पकडलं आहे. दरम्यान त्याच्या घरी पोलिसांना लॅपटॉप सापडला. त्याचीही तपासणी केली जातेय. रेहान कुरेशी हा विकृत आहे. त्याच्या पासपोर्टवर चेंबूरचा पत्ता लिहला आहे. रेहान 12वी पास आहे. त्याचबरोबर तो बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलींना तुमच्या अंगावर किडे पडलेत असं सांगून तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. अशा या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे.

तब्बल 500 तासांचं सीसीटीव्ही फुजेट तपासून नवी मुंबई पोलिसांनी रेहानला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस त्याची कसुन चौकशी करणार आहेत.

 

VIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...!

First published: September 27, 2018, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading