News18 Lokmat

शेअरबाजारात घोडदौड कायम, सेन्सेक्स रेकॉर्डब्रेक 32 हजारांच्या वर खुला

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने सतत तिसऱ्या दिवशी विक्रमी उसळी घेत 232 अंकांची वाढ दर्शवलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 11:41 AM IST

शेअरबाजारात घोडदौड कायम, सेन्सेक्स रेकॉर्डब्रेक 32 हजारांच्या वर खुला

14 जुलै : मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने सतत तिसऱ्या दिवशी विक्रमी उसळी घेत 232 अंकांची वाढ दर्शवलीय. महागाई दराचा निर्देशांकाने गाठलेला नीच्चांकी स्तर, अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदरात थोडी थोडी वाढ करण्याचे दिलेले संकेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेले तेजीचे वेध यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने हा विक्रमी टप्पा गाठलाय.

३१ हजारांच्या उच्चांकावरून ३२ हजारांपर्यंत पोहोचण्यास सेन्सेक्सला ३३ सेशन्स लागली. गुरुवारी बाजाराची सुरुवातच सकारात्मक झाल्यानंतर शेवटीही सेन्सेक्स २३२ अंकांनी उंचावून ३२,०३७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७५.६० अंकांनी वधारून ९,८९१.७० अंकांवर बंद झालाय.

शेअर बाजारात तेजी का?

महागाई निर्देशांकानं गाठलेला नीचांकी स्तर

अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदर वाढीचे संकेत

Loading...

आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळाले तेजीचे वेध

कोणत्या कंपन्यांना झाला नफा ?

आयटीसी कंपनीचे शेअर 3.03 टक्क्यांनी वधारले

एअरटेल, ICICI बँक, सन फार्माचे शेअर्सही 1.84 टक्के वाढले

ग्राहकोपयोगी वस्तू आणि बँकिंग कंपन्यांनाही मोठा फायदा

एफएमसीजी कंपन्यांचा निर्देशांकही 1.58 टक्क्यांवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...