अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ अधिकारी अभय कुरूंदकरला अटक

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ अधिकारी अभय कुरूंदकरला अटक

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

07 डिसेंबर : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर याला अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिसांनी ही अटक केली आहे. अश्विनी बेपत्ता होण्यामागं अभय कुरुंदकरचा हात असल्याचा आरोप बिद्रेंच्या कुटुंबियांनी केलाय.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे 2006 साली पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी...तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत.

विशेष म्हणजे अश्विनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली गेली. त्यानंतरही तपास लागत नाही म्हटल्यावर अश्विनीच्या भावानं आणि वडिलांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.  अश्विनींच्या घरच्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर यांच्यावर संशय व्यक्त केला होता.

अखेर प्रसारमाध्यमांनी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची बातमी उचलून धरल्यानंतर खडबडून जागे झाल्या पोलीस दलाने तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी अखेर आज पनवेल पोलिसांनी अभय कुरूंदकर यांना अटक केलीये. या अटकेनंतर अश्विनी बिद्रे दीड वर्षांपासून का बेपत्ता होत्या याचा खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 08:49 PM IST

ताज्या बातम्या