राज्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने संवेदनशीलपणे निर्णय घेऊन मदत करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको असंही त्यांनी स्पष्ट केलं. ऊसतोड कामगारांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याही घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली आहे. फडणवीस काय म्हणाले? 'एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे' अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. तसंच, 'एकनाथ खडसे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील' अशी प्रतिक्रियाही फडणवीस यांनी व्यक्त केली होती.पंकजा मुंडे Exclusive एकनाथ खडसे भाजप सोडणार का? मराठा आरक्षणाच्या वादावर काय आहे भूमिका? आणखी बरच काही... pic.twitter.com/OacFyxfxUI
— News18Lokmat (@News18lokmat) October 16, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde