काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण, मागील आठवड्यातच घेतली होती बैठक

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण, मागील आठवड्यातच घेतली होती बैठक

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मागील आठवड्यात गुरुवारी एक दिवस मुंबईत होते.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यासह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशातच काँग्रेसचे  महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मागील आठवड्यात गुरुवारी एक दिवस मुंबईत होते. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली होती.  या बैठकीला  बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेकजण या मिटींग उपस्थितीत होते.

त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

याआधी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

राज्यात आतापर्यंत 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

दरम्यान, राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने रविवारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.

राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा 1 लाखाचा टप्पाही गाठला.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 2 लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये 3, 4 आणि 5 लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही 7,8,9 आणि 10 लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला.

Published by: sachin Salve
First published: September 28, 2020, 11:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या