मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 28 एप्रिल: काँग्रेसचे (Congress) माजी मुंबईचे शहरध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचं कोरोनाची (Corona) लागण झाल्यामुळे निधन झालं आहे.  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsh Gaikwad) यांचे ते वडील होते.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोनाचा घेतला भलताचं धसका; वधूला आणायला दुचाकीवरून एकटाच आला नवरदेव

एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील धारावी भागात काँग्रेस पक्षासाठी मोठे काम केले होते. त्यांनी मुंबई शहर अध्यक्षपदही भूषवले होते. लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दोन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. जुलै 2019 मध्ये मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण खाते आहे.

लॉकडाऊनमध्येही तळीरामांची चंगळ; पुण्यात फेसबुकवरून होतेय दारूची विक्री

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे.

First published:

Tags: Congress, Corona, Covid19, Death, Maharashtra, Mumbai