News18 Lokmat

डोंबिवलीत आजी-आजोबा धावले मॅरेथाॅनमध्ये!

मनसेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन भरवण्यात आली होती.स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी झाली होती तर तब्बल 500 ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2018 11:32 AM IST

डोंबिवलीत आजी-आजोबा धावले मॅरेथाॅनमध्ये!

डोंबिवली, 11 फेब्रुवारी : मनसेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन भरवण्यात आली होती.स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी झाली होती तर तब्बल 500 ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

या स्पर्धेत 88 वर्षाच्या आजोबांनी भाग घेतला तर 80 वर्षाच्या अनेक आजीही सहभागी झाले होते. ही स्पर्धा 6 गटात पार पडली. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सकाळी 6.30 पासून उपस्थित होते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद तर होताच तर ही स्पर्धा दर वर्षी व्हावी असा आग्रही त्यांनी केला. या स्पर्धेला मनसे नेते राजू पाटील याचे विशेष सहकार्य लाभले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2018 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...