Home /News /mumbai /

'आपली प्रश्नावली पाठवावी', रश्मी शुक्लांचं मुंबई पोलिसांच्या समन्सला उत्तर

'आपली प्रश्नावली पाठवावी', रश्मी शुक्लांचं मुंबई पोलिसांच्या समन्सला उत्तर

रश्मी शुक्ला यांचा अहवाल लीक झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावले होते.

    मुंबई, 28 एप्रिल : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी (phone tapping case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. पण, कोरोनाने आपण येऊ शकणार नाही, प्रश्नावली पाठवावी, त्याला ईमेलने उत्तर देते, असं उत्तर महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने  (Maharashtra Cyber Cell Police) च्या समन्सवर दिले आहे. राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल लीक झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावले होते. आज त्यांना चौकशीसाठी हजर राहायचे होते. मासिक पाळी, प्रेग्नन्सी, रजोनिवृत्ती; या परिस्थितीत मी कोरोना लस घेऊ शकते का? पण, रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथील निवासस्थानी आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीमुळे येणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. तुम्ही प्रश्नावली ईमेलद्वारे पाठवावी, त्याला उत्तर देते, असं शुक्ला यांनी समन्सला उत्तर दिले आहे. रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला. सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते. त्यानंतर आता शुक्ला यांना चौकशीला सामोरं जावं लागत आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या