S M L

दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट

कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम याची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दाऊदची आई अमीना बी आणि बहीण हसीना पारकर यांनी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

Sonali Deshpande | Updated On: Apr 24, 2018 10:56 AM IST

दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट

विवेक कुलकर्णी, मुंबई, 20 एप्रिल : कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम याची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दाऊदची आई अमीना बी आणि बहीण हसीना पारकर यांनी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या आदेशामुळे दाऊदची दक्षिण मुंबईतील नागपाडा येथील कोट्यावधींची संपत्ती जप्त होणार आहे. यातील दोन संपत्ती अमीना बी तर पाच संपत्ती हसीना पारकर यांच्या नावावर आहेत.

दाऊदने गैरमार्गानं या संपत्ती जमा केल्या होत्या असा तपास यंत्रणांचा आरोप आहे. अमीना बी आणि हसीना पारकर या दोघीही जणी आता हयात नाहीयत. जप्तीच्या नोटीसेला आव्हान देता यावं याकरता आपल्याला एक  देण्यात यावी अशी मागणी या दोघींनी करून दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. आपल्याला योग्य पद्धतीनं नोटीस न दिली गेल्यानं आपल्याला त्यावर योग्य पद्धतीनं उत्तर देता आलं नाही असा या दोघींचा दावा होता.

SAFEMA (The Smugglers And Foreign Exchange Manipulators (Forfeiture Of Property) Act) अंतर्गत हसीना पारकर आणि तिची आई अमीना बी यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय १९९८ मध्ये ट्रिब्युनलनं आणि २०१२ मध्ये दिल्ली हा निर्णय योग्य ठरवला होता. नियमांनुसार ४५ दिवसांच्या SAFEMA च्या अंतर्गत आलेल्या नोटिसेला आव्हान न देण्यात आल्यानं कोर्टानं यांची याचिका फेटाळून लावली होती. ही इतकी संपत्ती आली कुठून याचं समाधानकारक उत्तर या दोघींनाही देत न आल्यानं संपत्ती जप्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. १९९३ च्या बाॅम्बस्फोट प्रकरणानंतर ही करावाई सुरू करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 12:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close