मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लोकल येत असताना पाहून रुळावर जाऊन झोपला तरुण, अंगावर शहारे आणणारा मुंबईतला LIVE VIDEO

लोकल येत असताना पाहून रुळावर जाऊन झोपला तरुण, अंगावर शहारे आणणारा मुंबईतला LIVE VIDEO

 तरुण रुळावर झोपला होता, त्याच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर लोकल थांबली होती.

तरुण रुळावर झोपला होता, त्याच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर लोकल थांबली होती.

तरुण रुळावर झोपला होता, त्याच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर लोकल थांबली होती.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 डिसेंबर : मुंबईमध्ये लोकल (mumbai local) समोर उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. अशीच एक घटना शिवडी (shivadi local station) लोकल स्थानकाजवळ घडली. एका तरुणाने आत्महत्येसाठी रुळावर जाऊन झोपला पण मोटरमॅनने (local train motorman) वेळीच गाडी थांबवून या तरुणाचा जीव वाचला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 27 डिसेंबर रोजी शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 11.32 ची बेलापूरकडे जाणारी लोकल सुटली. शिवडी स्थानकाजवळ लोकल पोहोचली असताना अचानक एक तरुण रुळावर चालत आला आणि रुळावर जाऊन आडवा झोपला.

रुळावर एक तरुण झोपलेला असल्याचे पाहून मोटरमॅन जे वाय वैती यांनी तातडीने इमरजन्सी ब्रेक लावले. त्यामुळे लोकल जागेवर थांबली. ज्या ठिकाणी तरुण रुळावर झोपला होता, त्याच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर लोकल थांबली होती. हा सगळा प्रकार तिथे तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने रुळाकडे धाव घेतली. तोपर्यंत हा तरुण रुळावरच झोपलेला होता. पोलिसांनी तिथे जाऊन त्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि रेल्वे स्थानकावर घेऊन आले.

(अनिरुद्धने संजनाला असं केलं बर्थडे विश, फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट)

तरुणाला रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर लोकल बेलापूरच्या दिशेनं रवाना झाला. प्रसंगावधान राखत मोटरमॅन जे वाय वैती यांनी लोकल थांबवून एका तरुणाचा जीव वाचवला. याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai local