News18 Lokmat

किरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर

पहाटेपासून धुवांधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2018 02:14 PM IST

किरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर

मुंबई, 25 जून : पहाटेपासून धुवांधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. याचबरोबर, ते म्हणाले, पालिकेनं काम चांगलं केलं आहे, त्यामुळे पाणी साचलं नाही.

वांद्र्याला शिक्षक मतदार संघात उद्धव ठाकरे मतदानाला येणार आहेत. म्हणून तिथलं पाणी उपसलं गेलं होतं. पण महापौर म्हणतायत तिथे पाणी साचलंच नाही.पण आजच्या पावसात उपनगर, चेंबुर, हिंदमाता इथे पाणी साचलं.

वडाळ्यातल्या अँटॉप हिल परिसरातील दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील भाग खचला आहे. याविषयी विचारले असता, ते म्हणाले, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतली असून संबंधित बांधकाम अनधिकृत नसल्याचे समजतंय.

मुंबईकरांना आज खूप त्रास सहन करावा लागला. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, महापौर शिक्षक असल्यानं शब्दांचे खेळ खेळतायत. नेहमीप्रमाणे महानगरपालिकेचं पावसाळ्यातलं हे अपयश आहे. पाणी तुंबलेल्या ठिकाणी महापौरांना फिरवलं पाहिजे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...