Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे इम्पॅक्ट, ट्वीट केल्यानंतर अवघ्या तासाभरात दिलीप वळसे पाटलांनी दिले आदेश

एकनाथ शिंदे इम्पॅक्ट, ट्वीट केल्यानंतर अवघ्या तासाभरात दिलीप वळसे पाटलांनी दिले आदेश

 एकनाथ शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी

एकनाथ शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी

एकनाथ शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी

    मुंबई, २५ जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी पत्र लिहून आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थितीत केला होता. त्यानंतर लगेच काही तासांत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर (mva government) मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप हे निराधार आहे.सरकारने कुणाचीही सुरक्षा काढण्यात आली नाही. पण आता राजकीय परिस्थिती पाहता कुटुंबीयांना पण संरक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार बहुमतात आहे, सरकार आहे तोपर्यंत निर्णय घेण्यात थांबू शकत नाहीत, मग तो जलद गतीने घेतलेले निर्णय असो की धीम्या गतीने आम्ही आमचं काम करत आहोत, असंही वळसे पाटील म्हणाले. 'त्यांनी आपल्याकडे किती आमदार असल्याचा दावा केला आहे, तो विधानभवनात आल्यावर स्पष्ट होईल. पण नव्या बदलानुसार10 व्या परिशिष्टनुसार दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. विधानसभा अध्यक्षना पूर्ण अधिकार आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय हे पक्षाला लागू असतात, त्यांच्याकडे आता गट एखाद्या पक्षात विलीन करण्याशिवाय पर्याय नाही, असंही वळसे पाटील म्हणाले. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस कमिशनर याची काळजी घेतील. पोलीस अधिकारी काम करत असताना काही नियम घालून दिले असतात, ते नियम त्यांनी पाळले की नाही हे बघू असंही वळसे पाटील म्हणाले. काय होता एकनाथ शिंदेंचा आरोप 'आम्ही शिवसेना विधिमंडळ पक्षाचे निवडून आलेले सदस्य आहोत, जे 2019 मध्ये झालेल्या 14 व्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या संबंधित मतदारसंघातून आमदार म्हणून विधिवत निवडून आले आहोत. आम्ही सध्याचे विद्यमान आमदार आहोत, तरीही आमच्या निवासस्थानी तसेच आमच्या कुटुंबातील सदस्यांना प्रोटोकॉलनुसार प्रदान केलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. एक सूड म्हणून. NCP आणि INC गुंडांचा समावेश असलेल्या MVA सरकारच्या मागण्या मान्य करण्यासाठी आमचा निश्चय तोडण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, हे सांगण्याची गरज नाही. ही सुरक्षा देण्याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्ही कोणत्या पक्षाची किंवा राजकारण्याची बाजू घेतो, यावर ते ठरत नाही. MVA च्या नेत्यांच्या याच कृत्यांमुळे आणि धमक्यांमुळे आम्हाला महाराष्ट्र राज्य सोडण्यास भाग पाडले गेले. सुरक्षा कर्मचार्‍यांना काढून टाकून केवळ आमच्या कुटुंबांच्या आणि नातेवाईकांच्या सुरक्षेशीच तडजोड केली गेली नाही तर असा एक अजेंडा देखील चालू आहे ज्यामध्ये मविआ सरकारचे विविध नेते त्यांच्या संबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणखी धमकावण्यासाठी हिंसाचार करण्यास प्रवृत्त करत आहेत' असं एकनाथ शिंदे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या