COVID-19: मुंबईत नवे नियम नाहीत, घाबरण्याचं कारण नाही - आदित्य ठाकरे

COVID-19: मुंबईत नवे नियम नाहीत, घाबरण्याचं कारण नाही - आदित्य ठाकरे

अनावश्यक गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई 17 सप्टेंबर: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरातल्या जमावबंदी आदेशाला मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सरकारच्या नियमांचं पालन करावं अशीही सूचना केली आहे.पण हा आदेश म्हणजे नवे नियम नाही फक्त आधीच्याच आदेशाला मुदतवाढ देण्यात आल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या जे व्यवहार सुरू आहेत तसेच ते सुरू राहणार आहेत.

कोरोना रूग्णांची संख्या मुंबई वाढत आहे. त्याचबरोबर अनलॉकमुळे गर्दीही वाढत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाणही वाढत आहे.  त्यामुळे गर्दी कमी कशी करता येईल याची प्रशासनाला चिंता आहे.

अनावश्यक गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे दररोजचे व्यवहार पूर्ववत होत असतांनाच कोरोनाला कसं रोखायचं हा प्रश्न सरकारपुढे आहे.

Corona झाल्याचं सांगून नवरा मुंबईतून झाला गायब; प्रेयसीबरोबर थाटला संसार

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका आता नव्या उपाय योजना करणार आहे. शुक्रवार (18 सप्टेंबर)पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याने महापालिका नवे नियम करणार आहे. जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंडही करण्यात येण्याची शक्यता आहे.

या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणेही सक्तीचं करण्यात येणार आहे.

कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, आशिष शेलारांचा घणाघात

तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्धही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. नियमांच पालन न करणाऱ्या 5 दुकानदारांविरुद्ध महापालिकेने कारवाई केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 17, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या