• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 2006 ला पहिलं लग्न, क्रांती रेडकरसोबत लग्नाआधी घटस्फोट; समीर वानखेडेंचं मलिकांच्या आरोपावर तात्काळ उत्तर

2006 ला पहिलं लग्न, क्रांती रेडकरसोबत लग्नाआधी घटस्फोट; समीर वानखेडेंचं मलिकांच्या आरोपावर तात्काळ उत्तर

2006 ला पहिलं लग्न, नंतर 2017 ला अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत पुन्हा विवाहबद्ध; मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही वेळापूर्वी दोन ट्विट करुन एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या संदर्भात दोन ट्विट केले होते. यावर आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांनी त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर नवीन प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. या प्रेस नोटमध्ये त्यांनी हे खासगी आयुष्यावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या खळबळजनक दोन ट्विटनंतर समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी प्रेस नोट जारी केली आहे. नवाब मलिक यांनी वैयक्तिक, बदनामीकारक, निंदनीय टिप्पणी केलेली पाहून खूप दुःख झाल्याचंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. 2006 मध्ये पहिलं लग्न झालं. 2016 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला गेला. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा लग्न केलं, असं वानखेडे म्हणालेत. बदनामीकारक आणि माझ्या कुटुंबाच्या गोपनीयतेवर अनावश्यक हल्ला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- ''प्रभाकर साहिलच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही'', संजय राऊत आक्रमक  माझ्याशी संबंधित खोटी कागदपत्रे व्हायरल केली जात असून या प्रकाराला मी कायदेशीर आव्हान देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  माझ्या मूळ गावी जाऊन याची शहानिशा करता येऊ शकते. माझा असल्याचं सांगून जो जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय, तो खोटा आहे, असंही समीर वानखेडेंनी म्हटलं आहे.  माझ्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचा इशारा वानखेडे यांनी दिला आहे. ''पहचान कौन'' समीर दाऊद वानखेडे; नवाब मलिकांचे दोन खळबळजनक Tweet राष्ट्रवादी काँग्रेस नेते (NCP leader) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB official Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) यांच्या लग्नातला फोटो ट्विटरवर (Twitter) शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी वानखेडे यांचा एकट्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलिक यांनी पहचान कौन? असा सवाल उपस्थित केला आहे. हेही वाचा- India vs Pakistan: पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचे पडसाद, संतप्त फॅन्सनी फोडले TV, VIDEO VIRAL तर दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेच्या एका सर्टिफिकेटचा फोटो पोस्ट केला आहे. शेअर केलेलं कागदपत्र नेमकं कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही आहे. हे कागदपत्र शेअर करताना नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांचं फर्जीवाडा येथून सुरु झालं असं कॅप्शन दिलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: