शाहरुख खानच्या बंगल्यासमोर इमारतीला भीषण आग, 22 वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू

शाहरुख खानच्या बंगल्यासमोर इमारतीला भीषण आग, 22 वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू

सी स्प्रिंग असं इमारतीचं नाव असून ही इमारत शाहरुख खानच्या मन्नत या घरासमोर आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : मुंबईतील वांद्रेमध्ये पॉश परिसरात मन्नतच्या समोर एका रहिवासी इमारतीला आग लागली. 6व्या मजल्यावर लागलेल्या या आगीत 22 वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. वांद्याच्या बँडस्टँड परिसरात सी स्प्रिंग या इमारतीला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवली.

सी स्प्रिंग असं इमारतीचं नाव असून ही इमारत शाहरुख खानच्या मन्नत या घरासमोर आहे. या आगीमध्ये 2 महिला जळाल्या. यातील एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ईव्हाना मॉरिस असं मृत्यू तरुणीचं नाव आहे तर सिफ्रा जाफरी असं 38 वर्षांची महिलेचं नाव आहे. सिफ्रा 90 टक्के भाजली असून तिला भाभा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Fire at Sea Springs building at Bandstand Bandra @SachinKalbag pic.twitter.com/cbZ3A32lyE

रहिवासी इमारत असल्यामुळे 6 व्या मजल्यावर कोणीतरी अडल्याची भीती होतीच. आग विझवल्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात आलं. या आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, आग नेमकी का लागली याचा आता पोलीस तपास करत आहेत. पण अशा मोठ्या इमारतीला आगेपर्यंत तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती का असा सवाल आता उपस्थित होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2020 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading