30 ऑगस्ट: मुंबईला काल पावसाने चांगलंच झोडपलं. जनजीवन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली आहे
काल मुंबईत 102 मि.मीहून जास्त पाऊस झाला. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. अनेक भागांमध्ये अजूनही साचलेलं पाणी ओसरलेलं नाही. त्यात हवामान खात्यानं येत्या 24 तासात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज शाळा कॉलेजेस सुट्टी दिल्याची घोषणा केली आहे.
जरी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
With today's heavy downpour &predictions for heavier rainfall; schools,college authorities instructed to remain closed tomorrow #MumbaiRains
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 29, 2017
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.