News18 Lokmat

घोटाळेबाज भाजप मंत्र्यांचा लेखाजोखा, सेनेनं काढली पुस्तिका

भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शिवसेनेनं हल्लाबोल केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2017 07:50 PM IST

घोटाळेबाज भाजप मंत्र्यांचा लेखाजोखा, सेनेनं काढली पुस्तिका

01 नोव्हेंबर : भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शिवसेनेनं हल्लाबोल केलाय. सेनेनं भाजप नेत्यांच्या घोटाळेबाज पुस्तकीचं प्रसिद्ध केलीये.

आज शिवसेनेनं राज्यभरातील त्यांच्या जिल्हासंपर्क प्रमुखांना भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पुस्तिका वाटण्यात आली. या माहिती पुस्तिकेत भाजपचे मंत्री, खासदार, आमदार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यात आली आहे.

राज्यभरातून आलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना, भाजप विरोधात आक्रमक प्रचार करण्याची रणनीतीचं शिवसेनेनं तयार करून दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. एका प्रकारे सत्तेत असलेल्या शिवसेनेनं आपल्या सहकाऱ्याला तीन वर्षांच्या अनोख्या शुभेच्छा दिल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...