सुप्रीम कोर्टाकडून अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी

सुप्रीम कोर्टाकडून अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी

सुप्रीम कोर्टाने एका 31 आठवड्यांच्या अल्पवयीन बलात्कारीत पीडितेला गर्भपातासाठी परवानगी दिली आहे. ' या मुलीचं अल्प वय आणि तिचं भविष्य लक्षात घेऊन आम्ही ही गर्भपाताची परवानगी देत असलो तरी या गर्भपातादरम्यान, तिच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाने एका 31 आठवड्यांच्या अल्पवयीन बलात्कारीत पीडितेला गर्भपातासाठी परवानगी दिली आहे. ' या मुलीचं अल्प वय आणि तिचं भविष्य लक्षात घेऊन आम्ही ही गर्भपाताची परवानगी देत असलो तरी या गर्भपातादरम्यान, तिच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत.

सर्वोच्च न्यायालयानं या अल्पवयीन मुलीच्या आरोग्याची वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी एक मेडिकल बोर्डही स्थापन केलं आहे. या मेडिकल बोर्डाच्या सल्ल्यानंतरच मुलीला गर्भपात करता येणार आहे. प्रचलित कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर महिलेला गर्भपात करण्यासाठी प्रतिबंध आहे. पण स्पेशल केस म्हणून सुप्रीम कोर्टाने या 31 आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी दिलीय.

यापूर्वीही बाळाच्या आरोग्याच्या प्रश्नावरून एका 26 आठवड्यांच्या गर्भपाताला कोर्टाने परवानगी दिली होती. या केसमध्ये बाळाचं ह्रदय कमकुवत होतं. तर या अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या केसमध्ये तिच्या भावी आयुष्यासोबतच तिच्या आरोग्याचाही मुद्दा कोर्टाने ग्राह्य धरलाय.

First published: September 6, 2017, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading