• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : किरण गोसावीचे धाबे दणाणले, म्हणाला, 'माझ्या जीवाला धोका'

BREAKING : किरण गोसावीचे धाबे दणाणले, म्हणाला, 'माझ्या जीवाला धोका'

'मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही'

'मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही'

'मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही'

  • Share this:
    मुंबई, 25 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी(aryan Khan arrest case)  पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या गौप्यस्फोटानंतर एकच खळबळ उडाली. गेल्या दिवसांपासून बेपत्ता असलेला पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) अखेर समोर आला आहे. आपल्या जीवाला धोका असून आपण पोलिसांना आत्मसमर्पण करणार असल्याचं किरण गोसावीने याने कबुल केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला आहे. CNN news18 शी संवाद साधून किरण गोसावी याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 'माझ्या जीवाला धोका आहे, आर्यन खानला अटक केल्यानंतर  3 ऑक्टोबरनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर सध्या राजकारण सुरू आहे, माझ्या जीवा धोका असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, असं किरण गोसावी म्हणाला. मागवला आयफोन, आला साबण! पण ग्राहक ठरला चोरावर मोर त्याचबरोबर प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही, त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला. 'मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे.

    पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया अडचणीत, आता चुकीला माफी नाही!

    दरम्यान,  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली आहे. तसंच त्यांनी कोर्टात एका प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यामध्ये त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केले आहेत. तसंच समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ तर दुसरीकडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB zonal director sameer wankhede) यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा आरोपी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या एनसीबीचं दिल्लीतील एक पथक मुंबईला येणार आहे. हा पथकात  NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह अन्य दोन इन्स्पेक्टर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published: