कोकणात नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने, कोण मारणार बाजी?

नारायण राणे आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यात सामना होत आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग, 29 डिसेंबर : सावंतवाडी आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण इथं कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यात सामना होत आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेत फक्त 18 हजार मतदार असले तरी इथे नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने ही निवडणूक लक्ष्यवेधी ठरली आहे. सावंतवाडी आणि रत्नागिरी या दोन्ही नगरपरिषदा निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरत आहे.

राणे विरुद्ध केसरकर

नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोकणात सातत्याने त्यांचा शिवसेनेसोबत संघर्ष झाला. या संघर्षातून अनेकदा कोकणात हिंसाही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कोकणात राणे-केसरकर सामना रंगू लागला आहे.

'वाईट नेत्याला साथ देणे महाराष्ट्राची चूक', अमृता फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

यंदाच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राणे-केसरकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झाडण्यात आल्या. 'नारायण राणे यांच्याकडील पैशाला रक्ताचा वास आहे,' असा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांच्या या टीकेला राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

'मर्द होतास तर का नाही केलास तपास ? असा सवाल नारायण राणे यांनी गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांना केला. 'केसरकरांनी सावंतवाडीत एकही विकास प्रकल्प सुरू केला नाही. माझ्यावर खूनाचा आरोप करणाऱ्या केसरकरांनी 5 वर्ष गृहराज्यमंत्री असताना तपास का केला नाही,' असा सवाल करत नारायण राणेंनी केसरकर यांना लक्ष्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading