Home /News /mumbai /

आम्ही एका विचाराने एकत्र आलो -शरद पवार

आम्ही एका विचाराने एकत्र आलो -शरद पवार

"ज्या गरिबांची गोष्ट सांगून मोदी पंतप्रधान झाले तेच आज गरीब आणि मागासवर्गीयांचे अधिकार मारत आहे"

 26 जानेवारी :   लोकांची अशी भावना आहे की घटनेच्या मुल्यांची पायमल्ली होते आहे. त्यामुळे एका विचाराने सर्व एकत्र आलो असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच मुंबईत आज विरोधकांनी संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राम जेठमलानी, तृणमूलचे दिनेश त्रिवेदी, पाटीदार नेता हार्दिक पटेल, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, नेते शरद यादव सहभागी झाले होते. मंत्रालयापासून निघालेली ही रॅली गेट वे आॅफ इंडियावर पोहोचली आणि सांगता झाली. या रॅलीत मोठ्या प्रमाणात विरोधपक्षांचे कार्यकर्ते, नेते सहभागी झाले होते. कोण काय म्हणालं ? लोकांची अशी भावना आहे की घटनेच्या मुल्यांची पायमल्ली होते आहे. त्यामुळे आम्ही सगळे जण एका विचाराने एकत्र झालोय. आता 29 जानेवारीला आम्ही सर्व पक्ष दिल्लीमध्ये एकत्र बसून पुढच्या रणनितीवर चर्चा करणार आहे अशी माहिती शरद पवारांनी दिली. संविधानाच्या गाभ्यावर हल्ला -येच्युरी भारत सुरक्षित राहावा, संविधानावर त्याच्या मूळ गाभ्यावर हल्ला आणि छेडछाड केली जाते आहे, सर्वसमावेशक भावनेवर हल्ला केला जातोय; आज देश लोकशाही वाचवण्याचा पुनर्संकल्प केला आहे की सर्व मूल्य कायम राहवीत यासाठी लढायचे असं मत  सीताराम येचुरींनी व्यक्त केलं. ही तर सुरुवात आहे- अल्पेश ठाकूर ज्या गरिबांची गोष्ट सांगून मोदी पंतप्रधान झाले तेच आज गरीब आणि मागासवर्गीयांचे अधिकार मारत आहे, आता सर्व समविचारी शक्ती एकत्र येऊन लढा उभारत आहोत, त्याची ही सुरुवात आहे अशी टीका अल्पेश ठाकूर यानी केली.  2019 मध्ये भाजपचा पराभव निश्चित -राजू शेट्टी सर्व शेतकरी संघटना भाजप सरकारच्या विरोधात एकत्र आले आहेत, हे सरकार बड्यांचे आहे. जर त्यांचे छुपे मनसुबे असेच राहिले तर 2019 मध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे असा हल्लाबोल राजू शेट्टींनी केला. आम्ही एकत्र येणार -पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस तयार आहे एकत्र येण्यासाठी, राज्यात एकत्र येणार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येणार असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. देशात चिंताजनक वातावरण -ओमर अब्दुल्ला देशात ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण केले गेले आहे ते चिंताजनक आहे, या विरोधात लढ्याची आज सुरुवात झाली ही आशादायक बाब आहे असं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. सरकार पक्षपात करत आहे, दंगली घडवण्याचा डाव आहे, तो हाणून पाडण्यासाठी आम्ही काम करत आहोत अशी माहिती  संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष मनोज अखारेंनी दिली.  
First published:

Tags: Bachav, Constitution, India, अशोक चव्हाण, ओमर अब्दुल्ला, काँग्रेस, तृणमूल, दिनेश त्रिवेदी, नेते शरद यादव, महाराष्ट्र, मुंबई, मोर्चा, राधाकृष्ण विखे पाटील, राम जेठमलानी, राष्ट्रवादी, रॅली, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, हार्दिक पटेल

पुढील बातम्या