Elec-widget

Aarey कॉलनीमध्ये पं. नेहरूंनी लावलं होतं पहिलं झाड... त्यानंतर चढला काश्मीरचा साज

Aarey कॉलनीमध्ये पं. नेहरूंनी लावलं होतं पहिलं झाड... त्यानंतर चढला काश्मीरचा साज

आरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल केल्याच्या विरोधात मुंबईकरांनी जोरदार आंदोलन केलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या वृक्षतोडीला स्थगिती दिली. गेले दोन दिवस या झाडांच्या कत्तलीमुळे आरे कॉलनी चर्चेत आहे. म्हणूनच मुंबईची फुफ्फुसं समजल्या जाणाऱ्या या भागाचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑक्टोबर : आरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल केल्याच्या विरोधात मुंबईकरांनी जोरदार आंदोलन केलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या वृक्षतोडीला स्थगिती दिली. गेले दोन दिवस या झाडांच्या कत्तलीमुळे आरे कॉलनी चर्चेत आहे. म्हणूनच मुंबईची फुफ्फुसं समजल्या जाणाऱ्या या भागाचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

नेहरुंनी केलं होतं उद्घाटन

स्वातंत्र्यानंतर लगेचच 4 वर्षांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक झाड लावून आरे कॉलनीचं उद्घाटन केलं. 1951 मध्ये मुंबईतल्या डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा आरे मिल्क कॉलनीचा प्रकल्प आणला. नेहरूंनी इथे पहिलं झालं लावल्यानंतर काही वर्षांतच इथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झालं आणि या जागेचं जंगलात रूपांतर झालं. हा पूर्ण परिसर 3 हजार 166 एकरमध्ये पसरलेला आहे.

याच जंगलात झाली फिल्मसिटी

आरे कॉलनीच्या या भागात 12 गावं आहेत. साई, गोरेगाव, फिल्मसिटी, रॉयल पाम्स, दिंडोशी, आरे, मरोळ या भागात 1977 मध्ये फिल्मच्या शूटिंगसाठी 200 हेक्टरमध्ये फिल्मसिटीची सुरुवात झाली.

Loading...

(हेही वाचा : सरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'! हे मिळणार फायदे)

आरे कॉलनी नैसर्गिक सौंदर्यामुळे सगळ्यांचं आकर्षण बनली. 1958 मध्ये प्रसिद्ध फिल्मनिर्माते बिमल रॉय यांनी मधुमती सिनेमाचं शूटिंग इथे केलं. याआधी त्यांनी नैनितालमध्ये या सिनेमाचं शूटिंग केलं होतं. त्याला मॅच करणारी दृश्यं त्यांनी आरे कॉलनीमध्ये शूट केली.

छोटा काश्मीर आणि नॅशनल पार्क

आरे मिल्क कॉलनी मुंबईच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इथे बागा, नर्सरी आणि तलाव आहेत. यामुळे छोटा काश्मीर हा एक पिकनिक स्पॉट आहे. जवळच संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने हा परिसर हिरवागार आहे. आरे कॉलनीच्या भागात एक फेरफटका मारला तरी मुंबईच्या कोलाहलातून थोडी उसंत मिळते. इथे भरपूर झाडी असल्यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास घेत येत होता. पण आता मात्र ही झाडं आपण गमावून बसलो आहोत.

=======================================================================================

VIDEO : अमिताभ बच्चन यांनी घेतलं दुर्गा देवीचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...