आदित्य ठाकरे म्हणाले, रात्री कारवाई करायला 'आरे' हे 'POK' नव्हे

आरेमधील वृक्षतोडीनंतर पर्यावरण प्रेमी, राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 09:54 PM IST

आदित्य ठाकरे म्हणाले, रात्री कारवाई करायला 'आरे' हे 'POK' नव्हे

मुंबई,5 ऑक्टोबर: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली. या प्रकरणावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'ट्विट' करत तसेच माध्यमांशी संवाद साधत प्रशासनाच्या कारवाईवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रात्री कारवाई करायला 'आरे' हे 'POK' नव्हे, अशा शब्दात आदित्य यांनी टीका करत या कारवाईचा निषेध व्यक्त केला. तसेच भाजप सरकारच्या वृक्षसंवर्धन मोहिमेवरही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

आरेमधील जैवविविधता संपवणे ही लज्जास्पद बाब आहे. मेट्रोचे अधिकारी ज्याप्रकारे आरेतील झाडांची कत्तल करत आहेत ते अत्यंत संतापजनक आहे. या अधिकाऱ्यांची पाक व्यपपीओकेमध्ये नेमणूक करायला हवी आणि झाडांऐवजी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्याचे काम त्यांना द्यावे, असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  सत्ता आल्यावर  'आरे'ला जंगल घोषित करण्यात येईल, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला.

Loading...

शिवसेना सुप्रीम कोर्टात धाव घेणार..

आरेमधील वृक्षतोडीनंतर पर्यावरण प्रेमी, राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे वृक्षाची कत्तल करणे नियमबाह्य आहे. या कारवाईच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आरेमधील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तब्बल 2.45 तास जंगलातून चालत आरेमध्ये पोहोचले. ते आरे परिसरात दाखल होताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरे परिसरात जमावबंदी लागू

मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचे समजताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आरे परिसरात धाव घेतली. ठिय्या आंदोलन केले. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना न जुमानता पोलीस आणि प्रशासनाने त्यांच्यावरच कारवाई केली. पोलिसांनी आतापर्यंत 38 जणांना अटक केली असून तर 55 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता सगळ्यांना कोर्टान न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर आरेमध्ये तणाव पसरला आहे. आरे परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केली. आरेचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 08:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...