आमची मागणी पूर्ण, कर्जमाफीच्या निर्णयावर समाधानी-दिवाकर रावते

आमची मागणी पूर्ण, कर्जमाफीच्या निर्णयावर समाधानी-दिवाकर रावते

'सत्तेत राहून काय करता येते ते शिवसेनेने दाखवलं, आमची मागणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी झाली मिळालीये "

  • Share this:

24 जून :सत्तेत राहून काय करता येते ते शिवसेनेने दाखवलं, आमची मागणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी झाली मिळालीये अशी प्रतिक्रिया सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलीये.

कर्जमाफीच्या घोषणेनंतर आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीने दिवाकर रावते यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय. पण त्याआधी फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केली होती.

अखेर आज कर्जमाफीचा निर्णय झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, आमची मागणी पूर्ण झाली. सर्वसाधारण शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आनंदी होईल, आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया दिवाकर रावतेंनी दिली.

तसंच सरकार पाच वर्ष टिकेल आमच्यात वाद आणि संवाद सुरूच राहिलं असंही रावते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2017 06:32 PM IST

ताज्या बातम्या