पुन्हा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले, अशी आहे नवी यादी

पुन्हा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले, अशी आहे नवी यादी

नव्या सरकारला काही महिने झाले तरी अजुनही बदल सुरूच आहेत. तर नाराजी नाट्यही संपलेलं नाही.

  • Share this:

मुंबई 15 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या होत्या. त्यात काँग्रेसचे कॅबिनेटमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. कोल्हापूरचं पालकंत्रिपद नको असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता काँग्रेसचे सतेज पाटील यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. याआधी त्यांच्याकडे विदर्भातल्या भंडाऱ्याचा चार्ज देण्यात आला होता. आता विश्वजित कदम यांच्याकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलंय. नव्या सरकारला काही महिने झाले तरी अजुनही बदल सुरूच आहेत. तर नाराजी नाट्यही संपलेलं नाही.

अशी आहे पालकमंत्रिपदाची नवी यादी

1. पुणे- अजित अनंतराव पवार

2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख

3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे

5. रायगड - आदिती सुनिल तटकरे

6. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब

7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत

8. पालघर- दादाजी दगडू भुसे

9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ

10. धुळे- अब्दुल नबी सत्तार

अमृता फडणवीसांचा नवा लूक, संक्रांतीच्या दिल्या खास शुभेच्छा

11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली- जयंत राजाराम पाटील

16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

19. जालना- राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

'जाणता राजा' वादावर शरद पवारांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा

21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख

25. लातूर- अमित विलासराव देशमुख

26. अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

बासाहेबांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढणार, मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय

31. नागपूर- नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा- विश्वजित पतंगराव कदम

34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 06:49 PM IST

ताज्या बातम्या