उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला लवकरच देणार सोडचिठ्ठी

खासदार उदयनराजे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 11:37 AM IST

उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला लवकरच देणार सोडचिठ्ठी

प्रफुल्ल साळुंखे, (प्रतिनिधी)

मुंबई, 21 ऑगस्ट- विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. खासदार उदयनराजे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांनी मंगळवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पस्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजे यांनी दाखवली आहे.

शरद पवारांची खेळी?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, ही गळती रोखण्यासाठी खासदार उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची हवा निर्माण करण्याची खेळी शरद पवार यांची असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काय आहे उदयनराजेंच्या मनात?

Loading...

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला परत एकदा मोठा धक्का बसू शकतो. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. उदनराजेंनी भाजपप्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोणते नेते युतीच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पद्मसिंह पाटलांसह त्यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. रामराजे आणि भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. करमाळ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे ही भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.

VIDEO : युतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टचाराबद्दल धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...