मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मराठा मोर्चाची आणखी एक मागणी मान्य, पुन्हा 'सारथी’ला मिळाली  स्वायतत्ता

मराठा मोर्चाची आणखी एक मागणी मान्य, पुन्हा 'सारथी’ला मिळाली  स्वायतत्ता

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने रोष आणखी वाढला होता. त्यामुळे सरकारने तातडीने कारवाई करत पुन्हा एकदा स्वायत्ता बहाल करण्याचा निर्णय घेतला.

पुणे 15 ऑक्टोबर: मराठा मोर्चाची आणखी एक मुख्य मागणी सरकारने मान्य केली आहे. मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला पुन्हा एकदा स्वायतत्ता बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठा मोर्चाची या संदर्भात आग्रही भूमिका होती. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याबद्दल मोठं आंदोलन उभारलं होतं. सारथीची स्थापना मराठा, कुणबी आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या संस्थेला जाणीवपूर्वक बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केले गेला. खासदार संभाजीराजे यांनी सारथी संस्थेल्या गैरकारभारासाठी 11 जानेवारीला पुण्यात 1 दिवसांचं लाक्षणिक उपोषणही केलं होतं. 'सारथी बचाव' अशी हाक देत मराठा समाजातील तरुणांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. 'सारथी'ला बदनाम करण्याचे काम केलं गेलं, असा आरोप संभाजीराजे यांनी केला होता. अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार अशी घोषणा करत त्यांनी आंदोलनही उभारलं होतं. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने रोष आणखी वाढला होता. त्यामुळे सरकारने तातडीने कारवाई करत पुन्हा एकदा स्वायत्ता बहाल करण्याचा निर्णय घेतला.
First published:

पुढील बातम्या