संक्रांतीनंतरही महाराष्ट्र गारठणार, 'या' भागात असणार सर्वाधिक थंडी

संक्रांतीनंतरही महाराष्ट्र गारठणार, 'या' भागात असणार सर्वाधिक थंडी

मकर संक्रांतीनंतर राज्यातील थंडी कमी होते आणि हळूहळू कमाल तापमान पारा वाढण्यास सुरुवात होते. यंदा मात्र निसर्ग चित्र थोडशी कलाटणी घेताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसंच मुंबई आणि ठाण्यात देखील पारा कोसळणार आहे.

खरंतर मकर संक्रांतीनंतर राज्यातील थंडी कमी होते आणि हळूहळू कमाल तापमान पारा वाढण्यास सुरुवात होते. यंदा मात्र निसर्ग चित्र थोडशी कलाटणी घेताना दिसत आहे. IMD GFS मॉडेल नुसार, राज्यात 20 जानेवारीपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत तर मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रमध्ये काही भागात किमान पारा 14 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल. तसंच मुंबई, ठाणे परिसरात 16 अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली येण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असून त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसात थंडी वाढेल असा अंदाज आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी अचानक कमी झाली होती. अनेक भागात तापमानाचा पारा वाढला होता. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हिवाळ्यात पाऊस पडला होता.

राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाढणार थंडी?

राज्यातील पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत तसंच अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात किमान सरासरी तापमान घसणार आहे. विदर्भात यंदा नेहमीच्या तुटलेले थंडी कमी होती. मात्र आता पुन्हा थंडी पडणार आहे. वास्तविक मकर संक्रांतीनंतर राज्यात तापमानात वाढ होत असते. मात्र यंदा काहीसं वेगळं चित्र दिसत आहे.

दरम्यान, यंदा डिसेंबर महिन्यात मुंबईतही ढगाळ वातावरण होतं. मुंबईतील काही भागांमध्ये हलकासा पाऊस देखील पडला होता. पुढील दोन दिवसानंतर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वातावरणातील बदल दिसून येईल आणि किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 19, 2021, 9:41 PM IST

ताज्या बातम्या