• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Sankashti Chaturthi 2021: संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे Facebook, WhatsApp मेसेज

Sankashti Chaturthi 2021: संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे Facebook, WhatsApp मेसेज

Sankashti Chaturthi June 2021: रविवारी (27 जून 2021) रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टीनिमित्त काही शुभेच्छा देणारे खास मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • Share this:
    मुंबई, 26 जून: श्री गणरायाचे पूजन करुन नव्या कामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. भाविक गणरायाची पूजा करुन आपल्या समस्या, संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करत असतात. दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi) सुद्धा भाविक दररोज पूजा करुन उपवास करत असतात. जून महिन्याच्या 27 तारखेला रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीसाठी चंद्रदोयाची वेळ रात्री 10 वाजून 1 मिनिटांची आहे. तसेच मंदिरातही जाऊन गणरायाचे दर्शन घेतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने भाविकांना आपल्या घऱातच गणरायाची मनोभावे पूजा करावी लागत आहे. मात्र, असे असले तरी काळजी करण्याचे कारण नाही आज आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियात व्हायरल होणारे काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत. ज्याच्य माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस (Sankashti whatsapp status), फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता. संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस (Sankashti Chaturthi 2021 Wishesh Marathi Messages) वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|  निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा|| गणपती बाप्पा मोरया तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,  सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना  संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा वंदन करतो गणरायाला,  हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला,  सुखी ठेव नेहमी...  सर्व गणेशभक्तांना  संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा हार फुलांचा घेऊनी  वाहु चला हो गणपतीला ट आद्य दैवत साऱ्या जगाचे  पुजन करुया गणरायाचे  संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आज संकष्ट चतुर्थी  सर्व गणेशभक्तांना  संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा...
    Published by:Sunil Desale
    First published: