संजय सावंत यांना 'रेड इंक' पुरस्कार प्रदान

संजय सावंत यांना 'रेड इंक' पुरस्कार प्रदान

नेटवर्क १८ ची वेबसाईट 'फर्स्ट पोस्ट'चे पत्रकार संजय सावंत यांना पर्यावरण विभागात हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

  • Share this:

07 जून : : मुंबई प्रेस क्लबकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत 'रेड इंक' पुरस्कार सोहळ्याचं दिमाखात वितरण पार पडलं. नेटवर्क १८ ची वेबसाईट 'फर्स्ट पोस्ट'चे मुंबई ब्युरो चीफ संजय सावंत यांना पर्यावरण विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

नरिमन पॉर्इंट येथील ‘एनसीपीए’ येथे प्रेस क्लब आयोजित ‘रेड इंक’ पुरस्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारविजेत्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

2016 मध्ये मराठवाड्यात दुष्काळाचं संजय सावंत यांनी फर्स्टपोस्ट या वेबसाईटसाठी विशेष वृत्तांकन केलं होतं. एकूण नऊ भागात दुष्काळाचं दाहक वास्तव जगासमोर आणलं होतं. तसंच धुळे जिल्ह्यात २००६ सालापासून राबवला गेलेल्या जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्नचं विशेष वृत्तांकन केलं होतं. या नऊ भागाच्या मालिकेमध्ये ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची मुलाखत घेण्यात आली होती.

संजय सावंत यांच्यासोबत त्यांच्या टीममध्ये श्रद्धा घाटगे, निरद पांढरपुरे, तुषार धारा या सहकाऱ्यांचा समावेश होता.

संजय सावंत यांच्या या वृत्तांकनबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक करत 'रेड इंक' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

 

 

First published: June 7, 2017, 11:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading