संजय राऊत यांचे भाजपवर पुन्हा Tweet?, 'घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती है..'

संजय राऊत यांचे भाजपवर पुन्हा Tweet?, 'घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती है..'

संजय राऊत यांच्या या ट्वीटमुळे राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

  • Share this:

मुंबई,26 डिसेंबर: विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीपासून ते सत्तेत येईपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे 'ट्वीटवॉर' सर्वांनीच पाहिले आहे. संजय राऊत आपल्या प्रत्येक ट्वीटमधून भाजपला सूचक इशारा करत आले आहेत. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेत आली तरी संजय राऊतांचे 'ट्वीटवॉर' सुरूच आहे. आजही राऊत यांनी एक ट्वीट केले आहे.

'तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं..' असे ट्वीट राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या या ट्वीटमुळे राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राऊत यांनी आपल्या ट्वीटमधून नेमके कोणत्या भाजप नेत्यावर टीका केली आहे, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

राणेंच्या पैशाला खुनाचा वास तर शिवसेनेचा नेता श्वान परंपरेतला..

दुसरीकडे, ऐन हिवाळ्यात कोकण तापलं आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यानी नारायण राणेंसह भाजपाच्या नेत्यांवर कडाडून टीका केली आहे. राणेंसह भाजपच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यानी केला. वेळ पडल्यास भाजपच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकर यांनी दिला आहे. या टिकेला प्रत्युत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी म्हटले आहे. त्यामुळे 29 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान सुरु झाले आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे नारायण राणे यांचाही प्रभाव आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर कोकणात राजकीय युद्ध तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नारायण राणे हे भाजपच्या अधिक जवळ गेले तर विधानसभा निवडणुकीत्या आधी त्यांनी आपला स्वाभिमान हा पक्षच भाजपमध्ये विलीन केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 09:37 AM IST

ताज्या बातम्या