मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संजय राऊतांनी राज्यपालांना इशारा देण्यासाठी केले ट्वीट, पण...

संजय राऊतांनी राज्यपालांना इशारा देण्यासाठी केले ट्वीट, पण...

सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून राज्यपालांनाच इशारा दिला खरा पण नंतर ट्वीटही मागे घेतलं.

सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून राज्यपालांनाच इशारा दिला खरा पण नंतर ट्वीटही मागे घेतलं.

सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून राज्यपालांनाच इशारा दिला खरा पण नंतर ट्वीटही मागे घेतलं.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 26 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर केला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचं काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून राज्यपालांनाच इशारा दिला. पण, काही मिनिटांनी ते ट्वीटही डिलीट केलं. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ रिट्वीट केला होता. हा व्हिडिओ आहे 'आजचा दिवस माझा' या चित्रपटाचा. या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातला मंत्रिमंडळ बैठकीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये 'संसदीय राज्य पद्धतीत दोन प्रमुख असतात एक राज्यपाल आणि दुसरा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे जनमताच्या आधारावर सत्तेवर येतात. जोपर्यंत विधानसभेत बहुमत हे मुख्यमंत्र्यांच्या बाजूने असते तोपर्यंत त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करू हे राज्यपालांचं कर्तृव्य आहे.  पण, आपले राज्यपाल हे राज्यात कायदा सुवस्थेत बिघाड करू पाहणारे अहवाल देऊन के आहे. त्यामुळे प्रतिमुख्यमंत्री बनू पाहणाऱ्या राज्यपालांना केंद्रानेच बदलावे असा ठराव पास करावा' असा  हा संवाद आहे. हेही वाचा -ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाला नवे वळण,राज्यपाल करणार 'दिल्ली'शी चर्चा? संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये 'राज्यपाल प्रती मुख्यमंत्री बनू पाहतात तेव्हा....' असं म्हणून एकाप्रकारे इशाराच दिला आहे. परंतु, व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर संजय राऊत यांनी आपले ट्वीट मागेही घेतले. याआधीही राऊत यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली होती. राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली आहे. पण, राज्यपालांनी या प्रकरणी कोणताही निर्णय न घेतला नाही. त्यामुळे  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत राज्यपालांवर टीका केली होती. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. हेही वाचा - 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? उद्धव ठाकरेंच्या संवादातील ठळक मुद्दे दरम्यान, संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली होती. आजही सामनाच्या लेखामधून राऊत यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि नारायण राणेंवर टीका केली.  महाराष्ट्रातील विरोक्षी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. राज्य संकटात असताना येथे अराजकाची आग लागावी अशी त्यांची इच्छा आहे. याकामी विरोधी पक्ष राज्यपाल या संस्थेस बदनाम करीत आहे.  विरोक्षी पक्षाचे नेते राजभवनात उठसूठ जातात व राज्यपाल हे फक्त भाजपचेच नेते आहेत अशा आविर्भावात भेटतात. त्यामुळे राज्यपालांची प्रतिमा खराब होत आहे. राज्याच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे मन मोकळे केले पाहिजे किंवा तक्रारी मांडल्या पाहिजेत. मात्र त्या राज्यपालांनाच सतत सांगणे, राज्यपालांच्या कानाशी लागणे कितपत योग्य आहे? एका ज्येष्ठ मंत्र्याने मला फोन केला व सांगितले, “विरोधी पक्ष नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी `सागर’ बंगला विशेष बाब म्हणून दिला आहे, पण विरोधी पक्षनेते राजभवनाचा परिसर सोडायला तयार नाहीत. राजभवनातील एखादे कॉटेज आता विरोधी पक्ष नेत्याचे अधिकृत निवासस्थान म्हणून जाहीर केले की झाले? परिस्थिती तीच झाली आहे!” विरोधी पक्ष स्वत:बरोबर राज्यपालांचे अध:पतन करीत आहे, अशी टीका राऊत यांनी केली. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: BJP, Sanjay raut, Shivsena, Uddhav Thackery

पुढील बातम्या