Home /News /mumbai /

शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीवर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले....

शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीवर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले....

'अशा गोष्टी सार्वजनिक होऊ शकत नाही, असं अमित शहा म्हणाले आहे. पण काही काळानंतर अशा गोष्टी सार्वजनिक केल्या जातात'

  मुंबई, 29 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची गुप्त भेट झाल्याच्या बातमीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  'जर भेट झाली तर त्यात चुकीचं काय आम्ही सुद्धा भेटू शकतो' अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवर आपली भूमिका मांडली. 'शरद पवार आणि अमित शहा यांची जर भेट झाली तर त्यात चुकीचं काय आहे. दोन्ही मोठे नेते आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे. त्यांच्याकडे काही तरी काम असेल म्हणून भेटले असेल. लोकसभेतील दोन नेते भेटले यात आश्चर्याची बाब नाही, यात कोणतही राजकारण नाही, राजकारणात कुठल्याच बैठकी या गुप्त नसतात. ही काही गुप्तश्वेर पांडे यांच्यासारखा विषय नाही', असं राऊत म्हणाले.

  शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

  'अशा गोष्टी सार्वजनिक होऊ शकत नाही, असं अमित शहा म्हणाले आहे. पण काही काळानंतर अशा गोष्टी सार्वजनिक केल्या जातात. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाली होती, ती मात्र जाहीर करण्यात आली होती, असा टोलाही राऊत यांनी लगावला. महाराष्ट्र राज्याची देशपातळीवर वेगळी प्रतिमा आहे.  देशपातळीवर महाराष्ट्राचा नाव खराब होत चाललं आहे. परंतु, ज्या पद्धतीने विरोधात माहोल बनवत आहेत तसा माहोल आम्ही त्यांना बनवू देणार नाही, असंही राऊत म्हणाले. 'आम्ही जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतो तेव्हा नक्कीच राजकीय चर्चा देखील होतात. कारण ते आमचे प्रमुख नेते आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करतच असतो. त्यांच्यासोबत राजकीय घडामोडींवर चर्चा होत असते, असंही राऊत यांनी स्पष्ट केले. प्रसिद्ध गायिका वैशाली माडे हाताला बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ; मराठी बिग बॉस.. 'महाविकास आघाडी सरकारलाला काहीही धोका नाही शंभर टक्के महाविकासआघाडी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.  एकमेकांवर टीकाटिपणी होतच राहते आणि ते झालं पाहिजे. भाजपच्या म्हणण्यानुसार, लोकशाही असायला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला. विरोधकांना होळीच्या शुभेच्छा. त्यांना कोणताच रंग नाही. ते बेरंग आहेत. त्यांना रंग असता तर त्यांनी चांगलेच रंग उधळले असते, त्यांनी आमच्या बरोबर येऊन प्रेमाची होळी खेळावी. त्यांनी आरोपांचे रंग उधळून नये, असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: शरद पवार, शिवसेना, संजय राऊत

  पुढील बातम्या