ऊर्मिला मातोंडकर सेनेत प्रवेशाबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...

ऊर्मिला मातोंडकर सेनेत प्रवेशाबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...

'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे, कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल', अशी घोषणाच केली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी ऊर्मिला मातोंडकर या सेनेत प्रवेश करणार आहे का? असं विचारलं असता राऊत म्हणाले की, 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल'.

मोठी बातमी, मुंबईत कोरोना लशीचा साठा ठेवण्याची जागा निश्चित

'पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगाला आदर्श दाखवून दिला आहे. इतक्या शांततेने आंदोलन केल आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पोलीस बळाचा वापर केला. तो वापर चीनसाठी केला असता तर लडाखमध्ये चीन सैन्य घुसले नसते', असा टोलाही राऊत यांनी मोदी सरकारला लगावला.

ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था या चीन सारख्या सीमेवर पाठवाव्या. कारण त्या दुष्मनांना जेरीस आणतात, त्यांना विरोधकांविरोधात कसे काम करायचे हे चांगले माहिती आहे, असंही राऊत म्हणाले.

ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी ऊर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे ऊर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऊर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन ऊर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्यानं त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता.

धक्कादायक! IPL सट्टेबाजीला विरोध केल्यामुळे, आई आणि बहिणीची हत्या

विशेष म्हणजे,  उल्लेखनीय म्हणजे शिवसेनेनं राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत ऊर्मिला मातोंडकर यांचं नाव राज्यपालांकडे दिलेलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती.

Published by: sachin Salve
First published: November 30, 2020, 10:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या