Home /News /mumbai /

संजय राऊतांनी 'जनता कर्फ्यू' वरून मोदींवर सडकून टीका, म्हणाले...

संजय राऊतांनी 'जनता कर्फ्यू' वरून मोदींवर सडकून टीका, म्हणाले...

'आपल्या पंतप्रधानांनी भीती आणि चिंतेच्या वातावरणातही इव्हेंट करून सण-उत्सवाचे वातावरण तयार केलं'

    मुंबई, 23 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी घरात राहावं यासाठी 'जनता कर्फ्यू' म्हणून एकदिवस घरात राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, 'जनता कर्फ्यू' पार पडताच लोकांनी घराबाहेर निघाले. मोदींच्या या 'जनता कर्फ्यू'वर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लोकं कोरोनाबद्दल गंभीर नसल्याबद्दल राऊत यांनी पंतप्रधानांना दोषी ठरवलं आहे. आपल्याकडील लोकं अजूनही लॉकडाउन सारख्या परिस्थितीला गांभिर्याने घेत नाही. आपल्या पंतप्रधानांनी भीती आणि चिंतेच्या वातावरणातही इव्हेंट करून सण-उत्सवाचे वातावरण तयार केलं, अशी टीका राऊत यांनी केली. तसंच, जर सरकार गंभीर असेल तरच लोकं गंभीर होतील, असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केल्यानंतर 22 मार्च रोजी देशभरातील जनतेनं घरी राहून 'जनता कर्फ्यू' ला चांगला प्रतिसाद दिला. परंतु, संध्याकाळी 5 वाजता कोरोना व्हायरसविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी घराच्या बाल्कणीत येऊन लोकांनी शंख आणि घंटानाद केला. पण, त्यानंतर जमावबंदी असतानाही लोकं रस्त्यावर मुक्तपणे फिरत आहे. काही ठिकाणी तर लोकांनी एकत्र येऊन डीजेही वाजवला. लोकांच्या अशा वागण्यावर खुद्द पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीला लोकं गांभिर्याने घेत नाही आहे. कृपया करून स्वत:ला वाचवा आणि आपल्या कुटुंबालाही सुखरुप ठेवा, नियमांचं काटेकोर पालन करा, असं आवाहन मोदींनी केलं. तसंच, प्रत्येक राज्यातील सरकारने नियम आणि कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या