Home /News /mumbai /

'राज्याला तेवढी गोड भेट द्या', संजय राऊतांनी दिल्या राज्यपालांना हटके शुभेच्छा

'राज्याला तेवढी गोड भेट द्या', संजय राऊतांनी दिल्या राज्यपालांना हटके शुभेच्छा

संजय राऊत यांनी ट्वीट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांना आपल्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

  मुंबई, 17 जून : महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आणि राज्यपाल यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राला नवीन नाही. पण आज राज्यपालांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा वाद निवळण्याची चिन्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याला गोड भेट द्यावी, अशी मागणीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांना आपल्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दाही राऊत यांनी राज्यपालांच्या लक्षात आणून दिला. 'महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त  गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील' असं म्हणत कोपरखळी लगावली आहे.

  Post Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे

  दरम्यान, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष असला तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजभवनावर पोहोचले.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंग आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत. राज्यपालांकडेच 12 आमदारांची यादी! विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा  मुद्या प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वाद पेटलेला आहे. मध्यंतरी यादी गहाळ झाल्याची माहिती समोर(RTI) आली होती. पण, ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीयांच्याकडेच असल्याची माहिती समोर आली आहे. Alert! 2-4 आठवड्यांतच महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट; टास्क फोर्सने केलं सावध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या 12 जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. ती यादी  माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती. 15 जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांने निर्णय घेतल्यावरच माहिती मिळेल, असं सांगण्यात आले आहे
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Sanjay raut

  पुढील बातम्या