अहमद भाई आपने ये क्या किया? संजय राऊत यांची भावनिक पोस्ट

अहमद भाई आपने ये क्या किया? संजय राऊत यांची भावनिक पोस्ट

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करून अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'अहमद पटेल यांचे निधन अत्यंत दुखःद आणि धक्कादायक आहे'

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : काँग्रेसचे (Congress) संकटमोचक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचं कोरोनामुळे  (Corona) निधन झालं. गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी 'अहमद भाई आपने ये क्या किया?' असं म्हणत दु:खद भावना व्यक्त केली.

संजय राऊत यांनी ट्वीट करून अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'अहमद पटेल यांचे निधन अत्यंत दुखःद आणि धक्कादायक आहे. आज खरी गरज असताना अहमद पटेल सोडून केले. काँग्रेसचा भक्कम स्तंभ कोसळला. अहमद भाई आपने ये क्या किया?' अशी भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही पटेल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 'अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून परिचित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या संघटनेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र कधीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. नेहमी व्यापक पक्षहित डोळ्यासमोर ठेवून काम केले' अशी भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पटेल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते  अहमद पटेल यांचे अकाली निधन दुःखदायक आहे.  काँग्रेससाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना  व्यक्त करतो" असं म्हणत पवारांनी श्रद्धांजली अर्पण केली.

अहमद पटेल यांना मागील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण (Ahmed Patel COVID Infected)  झाली होती. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल (Faisal Patel)यांनी गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचे पहाटे 3.30 वाजता निधन झाले, अशी माहिती दिली.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'अहमद पटेल यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. त्यांनी सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. त्यांनी आपल्या बुद्धीचार्तुयाने राजकीय जिवनामध्ये यश संपदान केले. त्यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत पायाभरणी करण्यात त्यांची भूमिका ही कायम लक्षात राहणारी आहे. त्याचा मुलगा फैसल याच्याशी संवाद साधला असून सात्वंन केले आहे. अहमद पटेल यांच्या आत्माला शांती लाभो'

तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

'आजचा दिवस आमच्यासाठी दुखद आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधार स्तंभ होते. त्यांनी पडत्या काळात पक्षासाठी मोलाचे काम केले. त्यांचे पक्षाच्या पायाभरणीत मोठे योगदान होते. त्यांची आठवण कायम राहिल'

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 9:26 AM IST
Tags:

ताज्या बातम्या