शिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून राणेंना घ्यावं लागलं -मुख्यमंत्री

शिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून राणेंना घ्यावं लागलं -मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुलाखतीत 2019 ला आपल्याला एकत्र यावचं लागणार असंही ठामपणे सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : "तुम्ही आमच्याशी जर सवतीप्रमाणे वागला नसता तर आम्हाला त्यांना (नारायण राणे) घेण्याची वेळ आली नसती" शा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना तडाखेबाज उत्तर दिली. तसंच येणाऱ्या काळात या देशातील हिंदुत्व विचाराचे एकत्र येतील. आपल्याला एकत्र यावंच लागेल असं सुचक वक्तव्यही मुख्यमंत्र्यांनी केलं.

दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८ पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजय राऊतांच्या 'बाऊन्सर'ला मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत टोलावले. मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा 'सामना' नाही असं स्पष्ट करा असा टोला मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना लगावला.

त्यानंतर राऊतांनी तुम्ही सामना दैनिक वाचत नाही असं सांगतात यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "मी जे बोलतो ते तुम्ही खरं मानू नका" असं सांगत सामना वाचत असल्याची पुष्टी दिली.

तसंच तुमच्या खात्यात १५ लाख जमा झाले का ? अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का ? असा सवाल खोचक प्रश्न राऊतांनी विचारला असता,  मुख्यमंत्री म्हणाले, २० वर्षात जेवढा काळा पैसा परत आला नाही तेवढा गेल्या ३ वर्षात परत आलाय असं म्हणत पंतप्रधान मोदींच्या आश्वासनावर उत्तर देणं टाळलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुलाखतीत 2019 ला आपल्याला एकत्र यावचं लागणार असंही ठामपणे सांगितलं.

संजय राऊत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुलाखतीतले सवाल जवाब

संजय राऊत - तुम्ही सामना दैनिक वाचत नाही असं सांगतात..

मुख्यमंत्री- मी जे म्हणतो ते तुम्ही खरं मानू नका...

संजय राऊत - महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होणार का...? हे तुम्ही कसं आत्मविश्वासानं सांगता...?

मुख्यमंत्री - शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचाराने चालतो, या देशातील हिंदुत्व विचाराचे एकत्र येतील. आपल्याला एकत्र यावंच लागेल...

मुख्यमंत्री - युती तुटली नसती तर कदाचीत उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते... तूम्ही देखील मुख्यमंत्री होई शकला असता

 संजय राऊत - २०१४ साली तुम्ही ज्योतिषाला पत्रिका दाखवली होती का...?

मुख्यमंत्री - मी पत्रिका दाखवली नाही. आपणच आपली पत्रिका कुणालाच दाखवू नये, त्यामुळे दिशा हीन होण्याची शक्यता असते.

संजय राऊत - या आधीचा युतीचा सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांकडे होता. आता सरकारचा रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे...?

मुख्यमंत्री - आता जर बाळासाहेब असते तर त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल द्यायला आवडलं असतं. आता आमच्या पक्षाचा रिमोट कंट्रोल कुणाकडेच नाही.

 संजय राऊत - तुमच्या काळात शेतकरी रस्तावर उतरून संघर्ष करतोय ?

मुख्यमंत्री - हे परिवर्तन आपण लगेच करू शकत नाही. ८२ % जमीन निसर्गावर अवलंबून आहे. आम्ही जेव्हा सत्तेवर आलो.. तेव्हा दुष्काळ जन्यपरिस्थिती होती. महाराष्ट्र कृषी उत्पादन २२ % होतं. आता ७५% या पावसात आपण कृषी उत्पादन झालंय. गेल्या १० वर्षातील विक्रमच आहे.

संजय राऊत- आजच विदर्भातील २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय.. सरकारने आतापर्यंत कर्जमाफी दिलीये? त्याची माहिती ही सरकारकडे नसते हे गंभीर आहे.

मुख्यमंत्री - एकूण एक शेतकऱ्यांच्या माहिती पेन ड्राईव्हवर आहे. शेतकऱ्यांची माहिती जिल्हा स्तरावर उपलब्ध आहे.

 संजय राऊत - भीमा कोरेगाव पेटलं तेव्हा कायदा सुव्यवस्था चा प्रश्नं निर्माण झाला.

मुख्यमंत्री - भीमा कोरेगावची घटना चुकीचीच होती. भीमा कोरेगावच्या घटनेत ८ लाख लोकं त्या ठिकाणी आले. कुणीही जखमी झाले नाहीत. एकाचा मृत्यू झाला तो वेगळया समाजाचा होता. त्या समाजाचं नाव मी इथे घेत नाही. इतर राज्यांतील दंगलीची परीस्थिती पाहिली तर महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था नक्कीच आहे.

संजय राऊत - महाराष्ट्रात सक्षम गृह मंत्री आहे का ?

मुख्यमंत्री - आर आर पाटील जेव्हा गृह मंत्री होते तेव्हाच त्यानी सांगितलं होतं.. गृहमंत्री पद हे मुख्यमंत्रीकडेच असावं...  मुख्यमंत्रीकेडे ठेवण्यात आलं कारण अनेक प्रश्नं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुलभ होतं. त्यामुळे माझ्या कार्यकाळात क्राईम रेशो कमी झालाय.

संजय राऊत - महाराष्ट्राची जनता एक बैल गाडी शोधते आहे.

मुख्यमंत्री - तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ वाट पहा...

संजय राऊत - २०१९ साली तुम्ही काय चित्र पहाता...

मुख्यमंत्री - एनडीए पुन्हा सत्तेत येईल...

संजय राऊत - तुमच्या काळात शेतकरी संपावर गेले, का?

मुख्यमंत्री - महाराष्ट्र सिंचन क्षमता केवळ १८ टक्के आहे

'जलयुक्त शिवार'ची किमया काय आहे ते कृषी दर पाहिल्यावर कळेल. आपल्याकडे ७५ टक्के पाऊस पडला

१० वर्षातलं उत्पादन झालं. मह्त्वाचं परिवर्तन काय म्हणजे आयात निर्यात योग्य होतेय योग्य वेळी उपाय केले तर काहीच परिणाम होत नाही.

संजय राऊत - तुमच्या खात्यात १५ लाख जमा झाले का...? अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का...?

मुख्यमंत्री - २० वर्षात जेवढा काळा पैसा परत आला नाही तेवढा गेल्या ३ वर्षात परत आलाय.

 संजय राऊत - नारायण राणे म्हणालेत की, पुन्हा युती झाली तर मी भाजपची साथ सोडेन. ते असं बोलतात तर मग तुम्ही त्याना का घेता...?

मुख्यमंत्री - तुम्ही आमच्याशी सवती प्रमाणे वागतात म्हणून आम्हाला त्यांना घ्यावं लागतं..याचा विचार तुम्हा करा...

संजय राऊत - दिल्लीत जायची इच्छा आहे का?

मुख्यमंत्री - मला उद्या नागपूरला जायला सांगितलं तरी मी जाईन, दिल्लीला जा सांगितलं तरी जाईन जे सांगितलं जाईल ते ऐकणार...

संजय राऊत - नारायण राणे यांनी सांगितलं की युती झाली तर मी बाहेर पडेनं..

मुख्यमंत्री - मी ती मुलाखत पाहिली नाही..पण याचं तुम्ही आत्मपरीक्षण करायाला पाहिजे तुम्ही आमच्याशी जर सवतीप्रमाणे वागला नसता तर आम्हाला त्यांना घेण्याची वेळ आली नसती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 10:08 PM IST

ताज्या बातम्या