मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /"... तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती, भाजपने त्यांच्यासोबत असं का केलं?" : संजय राऊतांचा खोचक सवाल

"... तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती, भाजपने त्यांच्यासोबत असं का केलं?" : संजय राऊतांचा खोचक सवाल

"... तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती, भाजपने त्यांच्यासोबत असं का केलं?" : संजय राऊत

"... तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती, भाजपने त्यांच्यासोबत असं का केलं?" : संजय राऊत

Sanjay Raut on MNS Chief Raj Thackeray Ayodhya tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. हा दौरा स्थगित झाल्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.

मुंबई, 20 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित (Raj Thackeray Ayodhya Tour postponed) करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे (MNS) आणि भाजपला (BJP) चांगलाच टोला लगावला आहे.

... तर आम्ही सहाकार्य केलं असतं

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यावर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत बोलताना मनसे आणि भाजप या दोघांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, इतर पक्षांचे काही कार्यक्रम तिकडे होते आणि आपल्या माध्यमातून मला कळालं की त्यांनी ते कार्यक्रम रद्द केले. पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही ते नक्की दिलं असतं अयोध्येच्या कार्यक्रमासाठी. शेवटी अयोध्या आहे.... अयोध्येत किंवा उत्तरप्रदेशात शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलं जातं.

वाचा : 5 जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, स्वत: राज ठाकरेंनी ट्विट करुन दिली माहिती

... आम्ही नक्की मदत करु

अयोध्येतील साधू संत, जनतेने... तीर्थयात्रेला लोकं जातच असतात त्यावेळी काही अडचणी असतात मग लोक विचारतात आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे काही मदत करु शकतातत का? शिवसेनेचं एक मदत कक्ष आहे. अयोध्या, मथुरा, काशी किंवा इतर ठिकाणी... आम्ही धार्मिक लोक आहोत हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. त्यामुळे कोणाला जर दर्शनाला जायला काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर नक्की आम्ही मदत करु. काय अडचणी आहेत मला माहिती नाही असंही संजय राऊत म्हणाले.

भाजपकडून राज्यातील नेत्यांचा वापर

संजय राऊत पुढे म्हणाले, भाजपने असं त्यांच्या बाबतीत का करावं ? हे चुकीचं आहे. प्रत्येकवेळी भाजप अशा खेळी करतं आणि महाराष्ट्रातील नेत्यांना वापरुन घेतं त्यांच्या स्वार्थासाठी त्यातचलाच हा प्रकार दिसत आहे. यातून जर काही शहाणपण काही लोकांना आलं तर बरं होईल. कारण यात नुकसान महाराष्ट्राचं होत आहे. आपण वापरले जात आहोत भाजपच्या हाताखाली हे काहींना उशीरा समजतं.

वाचा : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का'

कसा असेल आदित्य ठाकरेंचा दौरा?

आम्ही 15 जून रोजी जाणार आहोत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या दोरा करणार आहोत. फक्त दर्शनासाठी, ते काही राजकीय शक्तीप्रदर्शन, आव्हान, प्रतिआव्हान नाही. आदित्य ठाकरे यांच्या नेत्रृत्वाखाली ज्यांना-ज्यांना दर्शनाला यायचं आहे ते येतील. त्यानुसार तयारी सुरू आहे. 15 जूनला दर्शन घेतील, इतर काही त्यांचत्या गाठीभेटी आहेत. इस्कॉन मंदिरातही आदित्य ठाकरे भेट देणार आहेत. तसं त्यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आलं आहे असंही संजय राऊत म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Aaditya thackeray, Ayodhya, MNS, Raj Thackeray, Sanjay raut