• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले...

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले...

 शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत दाखवत राणेंची बोलती बंद केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत दाखवत राणेंची बोलती बंद केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत दाखवत राणेंची बोलती बंद केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 05 नोव्हेंबर : दिवाळीच्या सणातही राजकीय टोलेबाजी सुरूच आहे. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीवरून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी तो अपक्ष उमेदवार असल्याचा वक्तव्य केलं होतं. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत दाखवत राणेंची बोलती बंद केली आहे. आज सकाळी नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी ट्वीट करून जशाच तसे उत्तर दिले आहे. 'सबसे अलग हुं..पर गलत नही ! जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत.. त्यांचा हा जळफळाट आहे. जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा' असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. नवाब मलिकांच्या आरोपांमुळे समीर वानखेडेंकडून प्रकरणं काढली नाही, दरेकरांचा दावा तर दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. नारायण राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी करून ते भाजपमध्ये गेलेत. उद्या ते भाजपशीही बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जातील, आजपर्यंत नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कुणी केली नसेल. त्यामुळे राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी राणेंना फटकारून काढलं. काय म्हणाले होते राणे? रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं संजय राऊतांना भान राहत नाही,  संजय राऊतांचे अग्रलेख वाचले. अपक्ष उमेदवार हा दादरा नगर हवेलीत जिंकला. ती आम्ही जिंकली जिंकली असा डंका पिटला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतात. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात, असं नारायण राणेंनी म्हटलं.
  Published by:sachin Salve
  First published: