मुंबई 27 जून : राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान बंडखोर आमदार आपली भूमिका मांडत आहेत. अशात शिवसेनाही बंडखोरांचे आरोप खोडून त्यांच्यावरच उलट आरोप करताना दिसत आहे. नुकतंच पत्रकार परिषद घेत संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही आपली बाजू मांडली. बहुमत असेल तर मुंबईत या, असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना (Rebel Shivsena MLA) केलं आहे.
शेवटचा आमदारही "बाबा ओरडतील" म्हणून शिंदे गटात नाही आला; मनसेने आदित्य ठाकरेंना डिवचलं
भाजपची गुलामी करूनच आमदारांनी सुरक्षा मिळवली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बंडखोर आमदारांबाबत बोलताना राऊत म्हणाले, की शेवटी ती आमची लोकं आहेत. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी ममतेनी त्यांना सांभाळलं आहे. अशात उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊ ते गेले, हे अमानुष आहे. हे लोकांना न पटणारं आहे. ईडी आणि सीबीआय मतं मिळवून देणार नाही. ती जनता देते, असंही राऊत म्हणाले.
शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्याने बंडखोर आमदार नाराज असल्याबद्दल प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, भाजप सत्तेसोबत मुफ्तीसोंबतही जाऊ शकतं. तर हे मातीतील पक्ष आहेत. आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणत असाल तर एक उदाहरण दाखवा की आम्ही कधी हिंदुत्वाशी प्रतारणा केली. महाराष्ट्राला ही बंडखोरी न पटणारी आहे. जनतेचा संताप कोणीच रोखू शकणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरू, आणखी 2 शिवसेना आमदार गळाला!
उदय सामंतांच्या जाण्याने धक्का बसला नाही. सगळेच बंडखोर आमदार आमच्या जवळचे होते, असंही राऊत म्हणाले. ५० बंडखोर आहेत तर गुावाहीटत का बसला? बहुमत आहे तर मुंबईत या, असं आवाहन राऊतांनी केलं. आत्मा मेलेल्यांकडून निष्ठेची अपेक्षा काय करायची, असा टोलाही राऊतांनी लगावला. बापब बदलण्याची भाषा माझ्याआधी गुलाबरावांनी केली, असंही राऊत म्हणाले.
शिंदे गट एमआयएममध्ये जाऊ शकतो, असा दावाही राऊत यांनी केला. शिंदे गट मनसेत जाण्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, की मनसेला अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळालं तर नक्की जावं. हे ऐतिहासिक असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.