मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

6 वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर राऊतांचा रोखठोक सवाल

6 वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर राऊतांचा रोखठोक सवाल

शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरू असताना दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिखळण्याची चिन्ह दिसून येत आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरू असताना दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिखळण्याची चिन्ह दिसून येत आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरू असताना दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिखळण्याची चिन्ह दिसून येत आहे.

मुंबई, 26 ऑगस्ट : शिवसेना आणि भाजप (Shiv Sena vs BJP) यांच्यातील वाद आणखी चिघळत असल्याचं दिसत आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यावर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्या बाबत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. त्या थप्पडचा आवाज तुम्हाला सहा वर्षांनी ऐकायला आला? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. तुम्हाला मंत्रिपद काम करण्यासाठी दिलंय तुम्ही केंद्रीय मंत्री आहात ते तुमच्या खात्यातील काम करण्यासाठी आहात. त्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाला मंत्रिपद मिळालं आहे. इथे येऊन बकवास करु नका. तुम्ही देशाला रोजगार द्या तुमचं खातं मजबूत करा आम्ही तुमचं स्वागत करु. शहाणपणा करा आणि आमच्या अंगावर याल तर एक लक्षात घ्या ही शिवसेना आहे असा इशाराही राऊतांनी राणेंना दिला आहे. त्या पत्राच्या आधारे काहींना अटक संजय राऊत म्हणाले, काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना निनावी पत्र आलं होतं धमकीचं आणि त्या पत्राच्या आधारे काही लोकांना अटक झाली. त्यातील काही लोक अद्यापही तुरुंगात आहेत. सुटलेले नाहीयेत. त्यांच्याविरोधात काय पुरावे आहेत याबाबत संभ्रम आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात सोशल मीडियात काही अपशब्द वापरले गेले म्हणून 6-6 महिने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करुन तरुंगात टाकण्यात आले. भाजप Vs सेना वाद पेटला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात यूपीमध्ये तक्रार तर ती सुडाची कारवाई? प्रत्येकाला वाटतं की आमच्यावर सुडाने कारवाई होते. सुडाने कारवाई करण्यासाठी आमच्या हातात ईडी किंवा सीबीआय नाहीये. सुडाने कारवाई कुठे कारवाई होत आहेत या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक आणि देशातील इतरांच्या विरोधात कारवाई सुरू आहे त्याला सुडाची कारवाई म्हणत आहेत. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सुडाची कारवाई करत आहात आणि त्याला कायदेशीर कारवाई म्हणत आहात. महाराष्ट्रात धमकीच्या गुन्ह्याबद्दल जर कारवाई झाली तर ती सुडाची कारवाई? ती सुडाची असेल किंवा बिनबुडाची, कारवाई ही कायदेशीरच असते. भाजप कुणावरही गुन्हा दाखल करु शकतं इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील व्यक्तींवरही गुन्हा दाखल करु शकतात असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अनिल परबांची पाठराखण मंत्री हा सरकारचा भाग असतो. अनिल परब हे त्या भागातले पालकमंत्री आहेत. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. शिवाय ते त्यांच विषयावर बोलत होते हे न्यायालयात सिद्ध व्हावे लागेल. पालकमंत्र्यांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याचा अधिकार आहे असं म्हणत संजय राऊतांनी व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राऊतांचे अनिल परबांची पाठराखण केली आहे.
First published:

Tags: BJP, Sanjay raut

पुढील बातम्या