Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

'कुणाचाही पाठिंबा नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीत एकटे लढले. एकट्या तेजस्वी यांनी सर्वच पक्षांना कामाला लावून तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव हेच आहेत.'

    मुंबई, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीची ( Bihar Assembly Election) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालात एनडीएने (NDA) आघाडी घेतली आहे. पण, 'या निवडणुकीत  मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव (Tejasvi yadav) हेच आहेत. त्यांनी सगळ्यांना कामाला लावले आहे. जर काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले असते' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त करत सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'बिहारचे सर्व निकाल अजून समोर आलेले नाहीत. रात्री 10-11 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. 70 अशा जागांवर अटीतटीची लढत आहे. पण नितीशकुमार हे तिसऱ्या नंबरवर आहेत.  मुख्यमंत्रिपदी तीन वेळा राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आली आहे. सरकार फेल गेलीय, हेच समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी नितीश कुमारांना लगावला. बिहारचा रणसंग्राम आणि अमेरिकेतील सत्ताबदल! काय आहे या दोन्ही निवडणुकांचा संबंध? तेजस्वी यादव यांनी मोठ्या हिंमतीने निवडणूक लढवली आहे. सर्व निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा चेहरा राष्ट्रीय राजकारणात समोर आला. कुणाचाही पाठिंबा नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीत एकटे लढले. एकट्या तेजस्वी यांनी सर्वच पक्षांना कामाला लावून तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे  मॅन ऑफ द मॅच  तेजस्वी यादव हेच आहेत. कधी कधी मॅच हरल्यावरही त्यातील एकाला मॅन ऑफ द मॅच दिली जाते, ते तेजस्वी यांनाच द्यावे लागले, असंही राऊत म्हणाले. दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला खिंडार.. कसा झाला मालमत्तेचा लिलाव, पाहा VIDEO 'भाजप आता मित्रांना व्यवस्थित वागवते आहे.  त्यामुळे नितीश कुमार यांनी सेनेला धन्यवाद दिले पाहिजे. विशेष म्हणजे, भाजपचे नेते  देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीत प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर केंद्रातही त्यांचे वजन आहे. त्यामुळे त्यांनी नक्कीच बिहारमध्ये सूत्र फिरवली असतील, त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार त्यांचे अभिनंदन नक्कीच केले पाहिजे, असंही राऊत म्हणाले. मतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. पण जर काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या