'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे देशात पसरला कोरोना, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे देशात पसरला कोरोना, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. देशात कोरोनाचं संक्रमण होण्यास 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र  'सामना' मधून नरेंद्र मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.

हेही वाचा.. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाली मोठी रक्कम, सरकारनं खर्च केले फक्त 23 कोटी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच गुजरातसह मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचं संक्रमण झालं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींनी 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये एक रोड शो आयोजित केला होता. रोड शोनंतर दोन्ही नेत्यांनी मोटेरा क्रिकेट मैदानात जवळपास एक लाखाहून अधिक लोकांना संबोधित केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टमंडळातील काही सदस्यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यामुळे कोरोना विषाणूचं देशात संक्रमण झालं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच देशात लागू केलेल्या लॉकडाऊनवरूनही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. कोणतीही योजना न आखता देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र, आता जेव्हा लॉकडाऊन काढण्याची वेळ आली तेव्हा संपूर्ण जबाबदारी राज्यांवर सोडली आहे.

हेही वाचा...15 जूनपासून शाळा ? एका बाकावर एक विद्यार्थी; शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा

दरम्यान, महाराष्ट्र सरकार पाडण्याचे भाजपकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीला कोणताच धोका नाही. याचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

First published: May 31, 2020, 7:49 PM IST

ताज्या बातम्या